ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सिनगावं येथे बियाणे कंपनीच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सिनगाव जहांगीर येथे बियाणे विक्री क्षेत्रातील नामांकित कंपनी अंकुर सीड्स प्रा. लि.(नागपूर )यांच्या तर्फे 23 मार्च ला सामाजिक बांधिलकी (CSR-Corporate Social Responsibilty) या उपक्रमातून विद्याथ्यांना मोफत शालेय साहित्य व सन्मानपत्र वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा समिती चे अध्यक्ष श्री.बाळू भाऊ डोईफोडे , .उपसभापती श्री गजानन डोईफोडे ,ग्रा.वि.स.सो अध्यक्ष श्री शालिग्राम डोईफोडे ,तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री बबनराव डोईफोडे,श्री साहिनाथ नागरे ,श्री राधाकिसन मांटे,बेला किसान कृषी केंद्र दे राजा चे संचालक श्री अक्षय भाऊ डोईफोडे तसेच बुलढाणा जिल्हा मॅनेजर अंकुर सीडस श्री अभिजित सरनाईक साहेब व अंकुर सिड्सचे प्रतिनिधी,गावातील प्रगतशील शेतकरी व कृषि विक्रेते, सिनगाव गावचे शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद उपस्थित होते.त्यासोबतच यावर्षी कपाशी बियाणे लागवड करणारे व विक्रमी उत्पन्न घेणारे शेतकरी उपस्थित होते.

अंकुर सीड्स चे नवीन कपाशी वाण अंकुर कीर्ती, अंकुर हरीश, अंकुर साकेत, सोयाबीन अग्रेसर, प्रभाकर,तूर चारू व भाजीपाला याबद्दल माहिती देण्यात आली.तसेच हा उपक्रम राबविल्याबद्दल शाळेकडून कंपनी चे आभार मानण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये