ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदखेडराजा येथे सर्व नोडल अधिकारी, झोनल अधिकारी पोलीस अधिकारी यांची सभा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

पंचायत समिती सभागृह सिंदखेडराजा येथे २२मार्च ला लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील सर्व नोडल अधिकारी, झोनल अधिकारी, पोलीस अधिकारी, एस एस टी, व्ही एस टी, एफ एस टी,पथकातील सर्व कर्मचारी यांची मा. उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. संजय खडसे सरांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली.

एस एस टी पथकाकरिता आयोगाकडून सी व्हिजिल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे या पथकातील सर्व कर्मचाऱ्यांनी या ॲपचे रजिस्ट्रेशन करून घ्यावे आणि सर्वसाधारण नागरिकांनी केलेल्या तक्रारीची तात्काळ नोंद घ्यावी आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना खडसे साहेबांनी दिल्या.

एफ एस टी पथकाने प्राप्त झालेल्या तक्रारींची तक्रार स्थळी जाऊन चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई करण्याची सूचना सुद्धा साहेबांनी दिल्या आहेत. एस एस टी पथक 27 मार्च 2024 पासून कार्यान्वित होणार आहे तरी या पथकातील सर्व अधिकाऱ्यांनी/ कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडावी अशा सूचना त्यांना देण्यात आल्या.

 सर्व झोनल अधिकाऱ्यांनी सर्व मतदार केंद्राची पाहणी करून संवेदनशील मतदार केंद्राबाबत अहवाल तयार करून तो सादर करायच्या सूचना मा. खडसे सरांनी दिल्या आहेत.

 पोलीस झोनल अधिकाऱ्यांनी संवेदनशील भागातील मतदारसंघांना सुरक्षा पुरवण्यासाठी ची योग्य ती कार्यवाही करावी याबद्दल सरांनी मार्गदर्शन केले.

मा. गटविकास अधिकारी वेणीकर सरांनी लोकसभा निवडणुकी संदर्भात काही मार्गदर्शक सूचना सर्व कर्मचाऱ्यांना सांगितल्या, तसेच लोकसभा निवडणुकीला प्राधान्य देऊन सर्व प्रक्रिया यशस्वी रित्या पार पाडण्याचे आवाहन केले.

 आजच्या सभेला मा. उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम मॅडम, मा. गटविकास अधिकारी सिंदखेड राजा श्रीकृष्ण वेणीकर सर, मा. गट विकास अधिकारी देऊळगाव राजा मुकेश महोर सर, मा. नायब तहसीलदार सिंदखेडराजा मनोज सातव सर, मा. नायब तहसीलदार देऊळगांव राजा अस्मा मुजावर मॅडम, मा. पोलिस निरीक्षक सिंदखेडराजा शेळके सर, देऊळगाव राजा पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, व इतर अधिकारी,उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये