ब्रह्मपुरी तालुक्यात काँग्रेसला खिंडार
माजी नगराध्यक्ष अशोक भैय्या यांच्या मुलासह अनेक दिग्गज नेते भाजपत दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
लोकसभा निवडणुकीने आब्रु राखून असलेला तालुक्यातील काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीनंतर अस्ताव्यस्त होताना दिसत आहे. तालुक्यातील काँग्रेसला ठीकठिकाणी भगदाड पडताना दिसत आहेत. राज्याचे माजी विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मान. आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचा अजित दादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होऊन अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
अशी चर्चा जनतेत रंगत असतानाच, विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक समजले जाणारे, ब्रम्हपुरी नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती मान. विलासजी विखार,माजी प्रथम नगराध्यक्ष मान.अशोक भैय्या यांचे सुपुत्र माजी नगरसेवक श्री.गौरव भैय्या, माजी नगरसेवक डॉक्टर सतीश कावळे, माजी उपसभापती तथा अड्याळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच नामदेवजी लांजेवार,कृषी उत्पन्न बाजार समितीचचे माजी संचालक श्री.सुरेश दर्वे, यांनी दि.4 मार्च रोजी भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष मान.नाम.चंद्रकांतजी बावनकुळे साहेब यांनी भाजपाचा दुपट्टा प्रदान करून भाजपामध्ये प्रवेश कर घेतल्याचे घोषित केले आहे.
ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांच्याशी बातचीत केली असता ज्यांना जायचे त्यांनी पक्ष सोडून जावे ज्यांना काँग्रेस सोबत एकनिष्ठ राहायचे असेल त्यांनी पक्ष मजबूत करावा असे सांगितले