ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सांवगी मेघे पोलीसांनी मोटरसाकल चोरी करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध घेवून 4 तासाचे आत गुन्हा उघडकीस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पो.स्टे सावंगी मेघे येथे फिर्यादी प्रविण काळे रा. बोरगाव मेधे यांनी पो.स्टे ला रिपोर्ट दिला कि दि. 07.05.2025 रोजी दुपारी 12:00 वा चे सुमारास ते त्यांचे मालकीची होंडा शईन मो.सा. क. एम.एच 32 एस 3667 ने त्यांचे वडीलांना टिफीन आणून देण्यासाठी सावंगी दवाखाना येथे आले होते व त्यांनी त्यांची मोटरसायकल दवाखान्याचे बाहेर उभी करून ठेवली होती ती दुपारी 12:00 ते 12:30 वा थे सुमारास सावंगी दवाखान्याचे बाहेरून कोणत्यातरी अज्ञात ईसमाने चोरून नेली अषा फिर्यादी यांचे तांडी रिपोर्टवरून पो.स्टे सावंगी येथे अप.क. 417/2025 कलम 303(2) भा.न्या.सं. प्रमाणे नोंद आहे.

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून मा. ठाणेदार साहेब यांचे प्रत्यक्ष मार्गदर्षनात पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील गुन्हे शोध पथक हे चोरीस गेलेलया मोटरसायकल तसेच आरोपीचे शोधात असताना त्यांना मुखबीरकडुन खात्रीशिर माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील होंडा शाईन गाडी ही स्टेशनफैल वर्धा येथे राहणारा बबलू कैथवास याचे जवळ असून सध्या ति त्याचे घरी ठेवून आहे. अषा माहितीवरून सदर ईब्रमाचे घरी जावून पाहणी केली असता त्याचे घराला लागून असलेल्या टिनाचे शेडमधून गुन्हयातील चोरीस गेलेली ताब्यात घेवून त्याचेकडून पो.स्टे. सावंगी मेघे येथील नमुद गुन्हयातील चोरीस गेलेली होंडा शईन मो.सा. क. एम.एच 32 एस 3667 ही जप्त करून व आरोपीस अटक करून 4 तासाचे आत गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर साहेब, यांचे मार्गदर्शनात सहा पोलीस निरीक्षण श्री संदिप कापडे सा. ठाणेदार पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांचे निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार पो.हवा सतिश दरवरे, पोहवा संजय पंचभाई, पोहवा अनिल वैदय निलेष सयमा निखील फुटाणे, यांनी केली, पुढील तपास पोहवा संजय पंचभाई हे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये