ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये लैंगिक समानतेवर कार्यशाळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

गडचांदूर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात दिनांक 15 मार्च 2024 रोज शुक्रवारला लैंगिक समानतेवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या आंतरिक तक्रार समिती (Internal Complaint Committee) द्वारे करण्यात आले होते.

महिलांना शैक्षणिक व कामाच्या ठिकाणी असुरक्षितेलाला सामोरे जावे लागत असल्यामुळे, त्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारत सरकारने rights of women at educational and workplace (Prevention, Prohibition, Redressal) act 2013, कायदा पारित केला. या कायद्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी, व विविध प्रकारचे लैंगिक अत्याचार या कायद्याअंतर्गत येतात व त्यावर आळा कसा घालावा याविषयी माहिती पुरविणे या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट होते. या कार्यशाळेसाठी मुख्य मार्गदर्शिका म्हणून अँड. दीपांजली मंथनवार लिगल अँडवायजर कोरपणा कोर्ट उपस्थित होत्या. मुख्य अतिथी म्हणून मा. उज्वलाताई धोटे, सहसचिव गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर व कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून मा. सौ. स्मिताताई चिताडे प्राचार्य महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज गडचांदूर यांनीही मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव हे हजर होते, सोबतच कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. चेतन वैद्य समन्वयक ICC यांनी केली. कार्यशाळेचे संचालन प्रा. मनोहर बांद्रे ग्रंथपाल यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. संदीप घोडीले यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये