ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बल्लारशाह परिक्षेत्राअंतर्गत नियक्षेत्र कळमना कुकुडरांझीचे झुडपात मृत अवस्थेत आढळला वाघ

मृत्युचे खरे कारण शवविच्छेदनानंतर कळणार ;

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

आज दिनांक 29/07/2023 रोजी सकाळी 11.00 वाजताचे सुमारास बल्लारशाह परिक्षेत्राअंतर्गत नियक्षेत्र कळमना कक्ष क्र. 572 मधील सामाजिक वनिकरण रोपवाटीका कळमनाचे लगत कुकुडरांझीचे झुडपात एकवाघ असल्याचे माहीती मिळाली. त्या अनुषंगाणे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदण पोडचेलवार, ता.अं.व्या.प्र. चंद्रपुर यांना पाचारण करण्यात आले व त्यांचे समक्ष सदर परिसराची पाहणी केली. सदर झुडपात असलेला वाघ वन्यप्राणी मृत असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिली. सदर प्रकरण नियतक्षेत्र कळमना अंतर्गत वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वये प्राथमिक वनगुन्हा क्रमांक 08945/223613 /2023 दिनांक 29/07/2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर वाघ वन्यप्राण्याचे सर्व अवयव शाबुत असुन वन्यप्राण्याचे अंदाजे वय 4 वर्ष असुन लिंग मादी आहे. प्रकरर्णी मोकापंचनामा नोंदवुन वन्यप्राण्याचे शवास ताब्यात घेण्यात आले व शविच्छेदनासाठी ट्रांझीट ट्रिटमेंट सेंटर, चंद्रपुर येथे नेण्यात आले. वन्यप्राण्याचे मृत्युचे खरे कारण शवविच्छेदनानंतर सांगता येईल.

प्रकरणाचा पुढील तपास श्रीमती श्वेता बोड्डू, उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग चंद्रपुर व श्री. श्रीकांत पवार सहाय्यक वनसंरक्षक (वनी व वन्य) मध्य चांदा वनविभाग चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. नरेश भोवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह करीत आहे. सदर तपासाकरीता श्री. भगीरथ पुरी, क्षेत्र सहाय्यक कळमना व वनरक्षक कळमना यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये