अल्पवयीन मुलीला सहा महिन्यापूर्वी पळून नेलेल्याअज्ञात आरोपीस अटक
अल्पवयीन मुलगी ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी अविनाश नागदेवे
फिर्यादीने दि. 06/12/2024 रोजी पोलीस स्टेशन खरांगना येथे तोंडी रिपोर्ट दिला की, त्यांची अल्पवयीन मुलगी वय अंदाजे 16 वर्षे हिला अज्ञात आरोपीने फूस लावुन पळवून नेले. अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन खरांगणा येथे अप क्र. 992/2024 कलम 137(2) बीएनएस प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.
सदर गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा तथा स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे मार्फतीने करीत असताना मा. श्री अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा यांनी दिलेल्या विशेष सूचना व निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा तथा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्गदर्शक पथक तयार करण्यात आले. गुन्ह्यात मुखबिर लावून व तांत्रिक तपास करून यातील आरोपी नामे आकाश अनिल येडमे, वय 24 वर्ष, रा. कामठी, ता. वर्धा हा येथे असल्याची खात्री झाल्याने पथक रवाना करून नमूद आरोपीस व यातील पीडित अल्पवयीन मुलीस ताब्यात घेण्यात आले. आरोपी यास रीतसर कायद्याप्रमाणे अटक करण्यात आली असून पुढील तपास पो स्टे खरांगणा करीत आहे यातील अल्पवयीन मुलगी रीतसर कायद्याप्रमाणे पोस्ट खरांगणा यांच्याकडे देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक श्री सागर रतनकुमार कवडे यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी स्थानिक गुन्हे शाखा तथा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्गदर्शनात पोउपनि बालाजी लालपालवाले यांचेसह स.फौ. सुभाष राऊत, पो.हवा. खुशालपंथ राठोड, संजय राठोड, नितेश मेश्राम, म.पो.हवा. अर्चना जाधव, पो.शि. नवनाथ मुंडे असे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा तसेच सायबर सेल वर्धा येथील दिनेश बोथकर, अक्षय राऊत, गोविंद मुंडे, स्मिता महाजन यांनी केली.