ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ज्ञानगंगा नित्यानंद आश्रमात महाशिवरात्री उत्सव साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्ञानगंगा नित्यानंद आश्रम सेवा तथा गोपालन केंद्र कोलांडी नंदप्पा तहसील जीवती जिल्हा चंद्रपूर संस्थेच्या माध्यमातून महाशिवरात्री पर्वावर ध्यान साधना आणि यात्रा महोत्सवाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात 7 मार्च ला सकाळी श्री लिंगेश्वर रेड्डी (दालमिया सिमेंट नारांडा )यांच्या हस्ते कलश पूजन व भवानी मातेच्या मंदिराला कलश चढविण्यात आला यावेळी तेलंगाना, नांदेड, लातूर, वणी, चंद्रपूर, राजुरा, कोरपना, गडचांदूर,जिवती परिसरातील साधकांनी सामूहिक ध्यान व महासत्संगाच्या कार्यक्रमासाठी 1400 ते 1500 साधक भक्तानी शिव ध्यान आणि महा सत्संगाचा लाभ, तसेच रात्री बारा वाजे पासून अखंड शिव मंत्राचा जप सकाळी 10वाजेपर्यंत संपन्न झाला दुसऱ्या दिवशी दिनांक 8 मार्च ला सकाळी शिव पारायण,शिव लिंगाचा अभिषेक,हवन पूजन, तसेच महाशिवरात्री महोत्सव दर्शन सोहळा सुरू झाला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ अनिल चिताडे (गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली) यांचा संस्थे तर्फे सत्कार करण्यात आला त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून शैक्षणिक जीवनाचे अनुभव पठण केले आणि आध्यात्मिक महत्वा सोबत जागतिक महिला दिना निमित्त महिला शक्ती विषयी आपले विचार प्रकट केले,सौ स्मिता ताई अनिलराव चिताडे मॅडम (मुख्याध्यापिका महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर) यांचा सुद्धा संस्थे तर्फे सत्कार करण्यात आला त्यांनी जागतिक महिला दिना विषयी स्त्रीशक्ती व आध्यात्मिक विचार प्रकट केले तसेच सदैव सेवेसाठी तयार राहील अशी ग्वाही दिली, श्री दिलीप झाडे (कॉलर सर्च अकॅडमी संस्थापक कोरपना) यांचा संस्थे तर्फे तर्फे सत्कार करन्यात आला त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून संस्थेच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्माण करून या दुर्गम भागातील लोकांना रोजगार प्राप्त होण्यासाठी संस्थे तर्फे आपण काय केले पाहिजे यावर विचार प्रकट केले आणि या सेवेसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

डॉ. किसनराव भोयर (होमिओपॅथिक तज्ञ )यांचा संस्थे तर्फे सत्कार करण्यात आला त्यांनी आरोग्य विषयावर मार्गदर्शन करून या ग्रामीण भागातील गरिबांना निशुल्क आरोग्य सेवा प्राप्त करण्यासाठी संस्थे मध्ये आरोग्य शिबिर घेण्याचे प्रयोजन ठेवले , श्री महेश देवकते यांचा संस्थे तर्फे सत्कार करण्यात आला त्यानी आपल्या मनोगत व्यक्त करताना संस्थेला शासकीय दृष्टीने ‘ क’ वर्गाचे तीर्थ क्षेत्र म्हणून आणि इतर शासकीय कार्यासाठी त्यांनी सदैव सहकार्य करण्याचे विचार प्रकट केले आपल्या जिवती तालुक्यात एक निसर्गरम्य वातावरणात खरोखरच प्रेक्षणीय स्थळ कार्याची प्रशंशा केली सेवेसाठी सदैव तयार राहील अशी ग्वाही दिली श्री ए पी एस कोकाटे (पोलीस स्टेशन पिट्टीगुडा) यांचा संस्थे तर्फे सत्कार करण्यात आला त्यांनी घरातील वाद विवाद कायद्या मध्ये आल्यामुळे काय नुकसान होते यावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले श्री प्रफुल मालेकार संस्थापक (आय एस एम अकॅडमी गडचांदुर ) यांनी विद्यार्थी जीवनाचे शैक्षणिक विचार मांडले,श्री गणेश कदम उपसरपंच नंदप्पा यांचा संस्थे तर्फे सत्कार करण्यात आला त्यांनी नंदप्पा गावा तर्फे संस्थेच्या कार्याला सदैव सहकार्य करण्याची असे विचार प्रकट केले. माजी आमदार अँड वामनराव चटप डॉ. जयदेव चटप, डॉ.प्रफुल गोवादिपे, श्री प्रशांत गोखरे,सौ किशोरी प्रशांत गोखरें मॅडम श्री महादेव हेपट, यांचा सुद्धा संस्थे तर्फे सत्कार करण्यात आला.

महिला दिनाचे औचित्य साधून नंदा ताई शंकरराव देवाळकर यांचा सौ किशोरीताई प्रशांत गोखरे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला तसेच महाशिरात्री कार्यक्रमासाठी ध्यान मार्गाचा सर्वत्र प्रसार करण्याचा आपल्या भागात सदैव कार्य करणाऱ्या सेवेकऱ्यांचां संस्थे तर्फे सत्कार करण्यात आला.श्री दिनकर भाऊ चौधरी व त्यांचे सहकारी कावठाला तेलंगाना विभाग श्री अप्पा रावजी देवकते व त्यांचे सहकारी नांदेड विभाग श्री संजय भाऊ शिंदे श्री प्रफुल गोवारदिपे दौलत भाऊ मडावी पुजारी श्री सौ कोडापे आणि सौ मंदा ताई वडस्कर व सर्व गडचादुर येथील महिला सहकारी सेविकांच्या संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला तसेच श्री प्रशांत भाऊ गोखरे परिवारातर्फे गरीब महिलांना वस्त्रदान करण्यात आले.

तसेच महाशिवरात्रीच्या यात्रा महोत्सवात जिवती तालुक्यातील व परिसरातील दोन ते अडीच हजार भाविक भक्तांनी दर्शन घेऊन या कार्यक्रमाचा लाभ घेतला तसेच भक्तांना महाप्रसाद व रताळ प्रसाद वितरण करण्यात आला सायंकाळी सहा वाजेपर्यंत महाशिवरात्री यात्रा महोत्सव संपन्न झाला तसेच या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व सेवाकऱ्यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये