ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा.येथे “महाशिवरात्री निमित्त महंत जय प्रकाश उदासी महाराज यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महाशिवरात्री संपन्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाप्रसाद करण्याची प्रथा संपूर्ण देशामध्ये आहे त्याचप्रमाणे देऊळगाव राजा शहरात सुद्धा महंत जयप्रकाश प्रीतमदास उदासी महाराज यांनी वार्ड क्रमांक पंधरा मधील श्री महादेव मंदिर साळीवाडा येथे महाप्रसाद चे आयोजन येथील सहकार्यांच्या मदतीने केले होते.

त्याचा भाविकांनी लाभ घेतला. देऊळगाव राजा येथे महंत जयप्रकाश उदासी महाराज नेहमी अनेक धार्मिक कार्यक्रम पार पाडत असतात, त्यांच्या मठामध्ये विविध धार्मिक उत्सव व कार्यक्रम, महाप्रसाद नेहमी पार पडत असतात. या वर्षी महंत जयप्रकाश उदासी महाराज यांनी साळी वाडा येथील श्री भगवान शिवशंकर महादेव मंदिर येथे महाप्रसाद चे आयोजन केले होते. हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी त्यांना घनश्याम भंडारी, सुरेंद्र अबुससकर, विशाल नारायण नरोडे, संजय अंबुसकर शिवनाथ काळे, अशीष भालेराव, देविदास भालेराव, कुंदन अनिल गुप्ता आदी शिवभक्तांनी सहकार्य केले.

 या मंदिरामध्ये महंत जयप्रकाश उदासी महाराज यांनी मोठ्या श्रद्धेने व भावनेने भगवान श्री महादेवाचा महाप्रसाद आपल्या सहकार्याच्या मदतीने पार पाडला, त्याचा भाविकांनी लाभ घेतला. शहरामध्ये असलेल्या श्री पंचांग मोरेश्वर महादेव मंदिर येथे सुद्धा महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला त्याचा लाभ भाविकांनी घेतला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये