ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना येथे शहीद क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचे पुतळ्याचे अनावरण सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना नगरीत वीर बाबुराव शेडमाके यांचा पुतळा व सल्ला शक्ती चिन्हाचे अनावरण सोहळा ९ मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता कोरपना बस स्टॉप पासून रॅली काढण्यात आली, शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांचे पुतळ्याचे अनावरण सोहळा आदिवासी समाज बांधवांच्या साक्षीने मोठ्या उत्साहत पार पडला.

या प्रसंगी उद्घाटन विजयराव बावणे संचालक मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर, तसेच अध्यक्ष उत्तमराव पेचे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटी कोरपना, विशेष अतिथी सौ नंदाताई बावणे नगरपंचायत नगराध्यक्षा, प्रमुख अतिथी अशोक बावणे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना, सितारामजी कोडापे मा, सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर, संभाजी कोवे मा. उपसभापती पंचायत समिती कोरपना, गणेश गोडे संचालक बाजार समिती कोरपना, पुंडलिक गिरसावडे संचालक बाजार समिती कोरपना,सुरेश मालेकर, नगरपंचायतचे सर्व पदाधिकारी तसेच शहीद क्रांतिवीर बाबुराव शेडमाके सेवा मंडळ कोरपणा, आदिवासी बहुउद्देशीय सेवा मंडळ कोरपणा, ऑल इंडिया ट्रायबल फेडरेशन शाखा कोरपना आदिवासी युवक मंडळ कोरपना या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर तलांडे सर यांनी केले.

तर संचालन संजय मरापे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन विनोद वरखडे सर यांनी मानले या कार्यक्रमाला सर्व आदिवासी समाज बांधव व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये