ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आटपाडी तालुक्याचे भाग्यविधाते बाबासाहेब देशमुख दादा

चांदा ब्लास्ट

              उपेक्षित, वंचित, मागास, शेतकरी, कष्टकरी, अलुतेदार, बलुतेदार, महिला, विद्यार्थी, विद्यार्थीनी, अल्पसंख्याक, बहुजनांसह समस्त समाज घटकांसाठीच ज्यांनी आपले आयुष्य समर्पित केले, जगण्यासाठी देशभर स्थलांतर करणारे भागातले लोक, भागातच रहावेत यासाठी जंग जंग पछाडणारे, पाणी आडवा पाणी जिरवा या भूमिकेने आटपाडी तालुक्यातील सर्व वाड्या, वस्त्यांपर्यंत विविध उपाय योजना करण्यासाठी झुंजलेले, गाव तलाव, पाझर तलाव, पाटबंधारे तलाव यांचे मोठे जाळे निर्माण करणारे, पाणी हेच जीवन आहे, आणि सर्व समस्यांवरचा मुख्य उपाय आहे हे ओळखूनच भागात कायमस्वरूपी पाणी यावे म्हणून उभे आयुष्यभर तीळ तीळ तुटलेले, खानापूर, कडेगांव, आटपाडी या एकत्रित खानापूर पंचायत समितीचे आणि आटपाडी पंचायत समितीचेही पहिले सभापती, वाडी, वस्ती, गाव, तेथे रस्ता, शाळा हे धोरण सत्यात आणणारे, प्रचंड विस्तारलेली आटपाडी एज्यूकेशन सोसायटी, माणगंगा सह. साखर कारखान्या सह आटपाडी तालुक्यातील अनेक मातब्बर संस्था, व्यवस्था निर्मितीचे शिल्पकार ठरलेले, काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात खानापूर – आटपाडी विधानसभा मतदार संघातून समाजवादी काँग्रेसचा पहिला आमदार निवडून आणणारे, तत्कालीन समाजवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय नेते खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांचे सच्चे शिलेदार,

     रस्तुमराव चित्रोजीराव उर्फ बाबासाहेब देशमुख दादा यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या पवित्र आत्म्यास कोटी कोटी प्रणाम, नमस्ते, दुवाँ, सलाम.

सादिक पापामियाँ खाटीक आटपाडी जि. सांगली.

प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष ओबीसी विभाग महाराष्ट्र.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये