ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शंकर लोधी येथील शंकर देवस्थान व कपिलाई देवस्थानात अत्यावश्यक सोयी सुविधा करा

प्रा. सुग्रीव गोतावळे यांची पुरातन विभागाकडे निवेदनातून मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी नदीकाठाच्या तीरावर उंच अशा ठिकाणी शंकर देवस्थान अत्यंत पुरातन व प्राचीन असून या ठिकाणी महादेवाची यात्रा मोठ्या संख्येने आंध्र,महाराष्ट्र व तेलंगणातील भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात.परंतु त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते नाहीत पिण्याच्या पाण्याची सोय नाही विद्युत नाही यामुळे नागरिकांना जाण्या येण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

तसेच याच शंकरलोधीच्या दुसऱ्या बाजूला आदिवासींचे श्रद्धास्थान असलेल्या कपिलाई देवस्थान हे अत्यंत प्राचीन व इतिहासकालीन असून या ठिकाणी कपिलाईचे जागृत देवस्थान आहे.हजारो नागरिक या ठिकाणी येजा करतात याच ठिकाणी अत्यंत पुरातन व आजपर्यंत कोणालाही त्या भूगर्भातील भुयारातील संदर्भातला शोध घेता आला नाही. असे भुयार असून या भुयारात २०० मीटर वर गेल्यानंतर एक आत मधून नदी वाहते.परंतु ही नदी कुठून आली व कुठपर्यंत गेली. याचा अंदाज कोणालाही घेता आलेला नाही. त्याच भुयाराच्या वरच्या बाजूला संपूर्ण जंगल असून या भागाचा शोध इतिहासकालीन व संशोधकांनी घेतल्यास मोठे पुरावे या संदर्भातले बाहेर येऊ शकतात असे तेथील अनेक जाणकारांचे म्हणणे आहे परंतु या संदर्भात शासन व प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दखल न घेतल्यामुळे तालुक्यातील अत्यंत प्राचीन व पुरातत्व विभागाने याकडे लक्ष न दिल्यामुळे हा निसर्गरम्य भाग अजूनही दुर्लक्षित राहिला आहे.

त्यामुळे पुरातत्व विभागाने याकडे लक्ष घालून याचे संशोधन केल्यास यामध्ये खाणीचे साठे व अन्य काही बाहेर येऊ शकते व त्यामुळे या तालुक्याला एक आगळे वेगळे रूप व पर्यटन स्थळाचे केंद्र बनू शकते त्यामुळे येथील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल व दळणवळण यंत्रणा गतिमान होईल व तालुक्याला चांगले वैभव प्राप्त होईल अशी मागणी प्रा. सुग्रीव गोतावळे यांनी एका निवेदनाद्वारे पुरातत्त्व विभागाला केली आहे त्यामुळे पुरातत्व विभाग याकडे लक्ष देईल काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे?

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये