ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंजाब नॅशनल बँक अरविनाका येथे जागतिक महिला दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पंजाब नॅशनल बँक आर्वी नाका येथे महिला जागतिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला असून या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला व कर्मचारी उपस्थित होते. मात्र, महिला कोणत्याही बाबतीत मागे नाहीत. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. प्रत्येक ठिकाणी महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. समाजाच्या प्रगतीत पुरुषांइतकाच महिलांचाही वाटा असल्याचे दिसून येते.

8 मार्चला संपूर्ण ‘जगभरात महिला दिन’ साजरा केला करण्यात येत असतो. महिलांच्या सन्मानार्थ जगभरात मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा केला जातो. या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. महिला दिनाचे औचित्य साधून उपस्थित प्रत्येक महिलांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी महिला अध्यक्ष वैशाली भोयर यांनी महिला जागतिक दिना बद्दल माहिती दिली तसेच श्री अग्रवाल यांनी महिला पुरुष आणि महिला यातील फरक यावर मार्गदर्शन केले. श्री ठाकरे यांनी गीत गाऊन महिलांना प्रोत्साहीत केले.

    यावेळी शाखा प्रबंधक धर्मदास डेकाटे, गौरव गोटेकर, आणि शाखेतील कर्मचारी दिपाली बावनकर,सरला चापडे, रवी चातूरकर, गणेश चौके,आशिक सीडाम,दिनेश उपाध्याय, सविता कोडापे,केळझरकर, विशाल हजारे,वैशाली लांडगे, स्मिता धुरतकर,सारिका सावरकर, बंडू कडू, भावना भांदककर,ठाकरे, दीप्ती ससनकर इत्यादी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये