ताज्या घडामोडी

अवैध दारू तस्करीचे वाहन पोलिसांच्या ताब्यात – चंद्रपूर मार्गे गडचिरोली जिल्ह्यात सुरू होती तस्करी

मध्यप्रदेशात तस्करीचे केंद्र असण्याची शक्यता - 10 लाख 24 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

नवनियुक्त पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन ह्यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सज्ज झाली असुन अवैध धंदे करणाऱ्या लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरीही काही मुजोर गुंड प्रवृत्तीचे लोक आपले अवैध धंदे राजरोसपणे सुरू ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांनाही स्थानिक गुन्हे शाखेने तडाखा दिला असुन मध्य प्रदेश राज्यातून चंद्रपूर मार्गे गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध मद्य तस्करी करणाऱ्या एका वाहनाला पकडुन 10 लाख 24 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार अवैध मार्गाने व्यवसाय करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन ह्यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार ह्यांनी वेगवेगळी पथके स्थापन केली आहेत. अशातच ह्यापैकी एका पथकाला गोपनीय माहिती मिळाली की लगतच्या मध्यप्रदेश राज्यातून अवैधरीत्या मद्याची तस्करी सुरू असुन 7 मार्च रोजी गडचिरोली जिल्ह्यात अवैधरीत्या मद्याची खेप पोचती केल्या जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विसापूर टोल नाक्याजवळ सापळा रचला. दरम्यान टोल नाक्याजवळ एक बोलेरो पिकअप वाहन संशयास्पदरित्या येत असल्याचे आढळल्याने पथकाने ते वाहन अडवून झडती घेतली असता त्यात गोवा ब्रँडच्या दारूने भरलेल्या 180 मिलीच्या 39 पेट्या आढळून आल्या.

अवैध वाहतूक होत असलेला मद्यसाठा दिसताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहन चालक 21 वर्षीय फारुख शेख मुमताज शेख रा. नागपूर, 23 वर्षीय तुषार संतोष नेहारे ह्यांना अटक करून तस्करी साठी वापरण्यात येत असलेले बोलेरो पीक अप वाहन, मोबाईल व दारूच्या पेट्या असा एकूण 10 लाख 24 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन आरोपींना अटक करून बल्लारपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, संजय आतकुलवार, गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे व सायबर गुन्हे शाखेचे राहुल पोंदे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये