ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा रस्ता सुरक्षा उपाययोजना अभियानात…

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले वर्धा यांच्या हस्ते मोकाट जनावरांना जिओ टॅगींग करून रिफ्लेंक्टव्ह बेल्ट लावण्यात आले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक रोजी जिल्हा रस्ता सुरक्षा उपाययोजना अभियाना अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत मोकाट जनावरांना जिओ टॅगींग करून रिफ्लेंक्टव्ह बेल्ट लावून ट्रॅक्टर ट्रेलर व बैलबंडी यांना रिफ्लेंक्टव्ह बॅनर लावण्याबाबतचा कार्यक्रम एम आय डी सी सेवाग्राम येथे अवचट इन्डस्टीज यांच्या प्रांणागणात वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.अपघातामध्ये अनेकदा जनावरे व कुत्रे यांचा रात्रीच्या वेळी अपघात होतो ज्यामध्ये त्यांच्या मृत्यू घडून येतो हा मृत्यू घडण्याचे कारण एकच असते की वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांला अंधारामध्ये हि भटकी जनावरे रात्रीच्या वेळी रस्त्यामध्ये दिसून आल्यास होणारा अपघात टाळू शकतो अंधारात ही भटकी जनावरे वाहन चालकांना दिसावी याकरिता त्यांच्या गळ्यात परावर्तक पट्टे घातल्यास अश्या घडणाऱ्या अपघांताना टाळण्यास विभागास यश मिळू शकेल तसेच ट्रॅक्टर ट्रेलर व बैलबंडी या वाहनांना परावर्तीत बॅनर रिफ्लेंक्टव्ह बॅनर लावण्यास रात्रीच्या वेळेस सदर वाहने ही वाहन चालकांना निदर्शनास येईल व सदर वाहनांचे होणारे संभाव्य अपघात टाळण्यास मदत होईल.

असे मोहम्मद समीर मोहम्मद याकुब उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वर्धा यांनी प्रतिप्रादीत केले तसेच सदर कार्यक्रमामध्ये जनावरांना जिओ टॅगींग करून रिफ्लेंक्टव्ह बेल्ट लावणे व ट्रॅक्टर ट्रेलर व बैलबंडी यांना रिफ्लेंक्टव्ह बॅनर लावणे तसेच जिओ टॅगींग प्रात्यक्षिकाचे सादरीकरण करण्यात आले आणि रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने त्यांचे महत्त्व पटवून देण्यात आले तसेच वर्धा जिल्हात जवळपास 1126 जनावरांना रिफ्लेंक्टव्ह बेल्ट लावण्यात आले याकरिता अवचट मार्केटिंगचे शांतारामजी अवचट मानीकराव अवचट सागर अवचट तसेच व्हि केयर फाॅर या एन जी ओ चे व पीपल्स फाॅर ॲनिमल वर्धा युनिटचे आशिष गोसावी यांचे सहकार्य लाभले.

सदर कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने पशु पालक ट्रॅक्टर ट्रेलर व बैलबंडी तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा येथील मोटार वाहन निरीक्षक प्रफुल्ल मेश्राम सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गांवडे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ढोक सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक भगत उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये