ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेककडून नवीकरणीय ऊर्जा वापरालागती देण्यासाठी फ्लोटिंग सोलार पॅनेल्सचा अवलंब

सौर पॅनेल बसवल्याने ऊर्जा निर्माण होण्यासह बाष्पीभवनामुळे पाण्याचे होणारे नुकसान जवळपास ७० टक्क्यांपर्यंत कमी होण्यास होईल मदत

चांदा ब्लास्ट

 अल्ट्राटेकचे उत्पादन युनिट आवारपूर सिमेंट वर्क्सने त्यांच्या आवारातील खाणी परिसरात असलेल्या ३६०० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या दोन जलसाठ्यांमध्ये फ्लोटिंग सोलर फोटोव्होल्टेइक पॅनल्स (एफएसपीव्ही) स्थापित केले आहेत.

४.०९६ MWp (३.३० मेगावॅट एसी) च्या डीसी क्षमतेसह सौर प्रकल्पात जवळपास ७६०० सौर पॅनल्स आहेत. त्या प्रकल्पाची वार्षिक ६,१७३ MWh सौरऊर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे. या सौर उर्जा प्रकल्पामुळे वार्षिक जवळपास ६००० मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल, जे कि २.७ लाख परिपक्व झाडांच्या पृथक्करण फायद्यांइतके आहे.

हा प्रकल्प कॅप्टिव्ह मोड अंतर्गत स्थापित करण्यात आला आहे, ज्यामध्ये निर्मित करण्यात आलेली १०० टक्के वीज अल्ट्राटेक वापरेल. युनिटच्या जल संचयन उपक्रमाचा भाग म्हणून जलसाठे तयार केले गेले आणि त्यांची पाण्याची एकूण क्षमता १,१०,००० घनमीटर आहे. जलसाठ्यांवर सौर पॅनेल बसवल्याने ऊर्जा निर्माण होण्यासह बाष्पीभवनामुळे पाण्याचे होणारे नुकसान जवळपास ७० टक्क्यांपर्यंत कमी होण्यास मदत होईल.

स्थानिक परिसंस्थेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. हे पाण्याची गुणवत्ता आणि आच्छादन राखण्यास योगदान देते जे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. अल्गल ब्लूम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शैवालाच्या प्रमाणात झपाट्याने होणारी वाढ कमी करण्यावर एफएसपीव्हींचे सकारात्मक परिणाम होतात. ऊर्जा निर्मितीसाठी जलस्रोतांवर सौर पॅनेल बसवण्याच्या या उपक्रमाद्वारे अल्ट्राटेक सौर पॅनेलच्या उपयोजनेसाठी जमिनीच्या उपलब्धतेत महत्त्वाचा अडथळा दूर करून जवळपास ३६०० चौरस मीटर जमिनीचा वापर इष्टतम करण्याचे उद्दीष्ट आहे. 

अल्ट्राटेकमधील ऊर्जा परिवर्तन

आरई१०० च्या कटिबद्धतेचा भाग म्हणून अल्ट्राटेकने २०५० पर्यंत १०० टक्के वीजेची गरज नवीकरणीय स्त्रोतांद्वारे पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ईपी१०० ची सदस्य असलेली अल्ट्राटेक आपली ऊर्जा उत्पादकता दुप्पट करण्याप्रती कटिबद्ध आहे.

अल्ट्राटेकने २०३० पर्यंत एकूण ऊर्जा मिश्रणातील हरित ऊर्जेचा एकूण वाटा ८५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे. अंतरिम लक्ष्य म्हणून अल्ट्राटेकची एकूण हरित उर्जेचा वाटा सध्याच्या २२ टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत, आर्थिक वर्ष २०२६ पर्यंत वाढवण्याची योजना आहे. एकूण ऊर्जा मिश्रणात हरित ऊर्जेचा वाटा वाढवण्यासाठी अल्ट्राटेक नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांचा वापर आणि वेस्ट हीट रिकव्हरी सिस्टम्स (डब्ल्यूएचआरएस) चा विस्तार यांसह अनेक उपक्रम राबवले आहेत. 

आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत अल्ट्राटेकची ७१९ मेगावॅट हरित ऊर्जा क्षमता आहे, ज्यामध्ये २६४ मेगावॅट डब्ल्यूएचआरएस स्थापित क्षमता आणि ४५५ मेगावॅट कराराचे नवीकरणीय ऊर्जेचा समावेश आहे. एकूण, हे प्रमाण अल्ट्राटेकच्या सध्याच्या २४ टक्के ऊर्जा आवश्यकतांची पूर्तता करते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये