गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्कूल बॅगमध्ये सुगंधीत तंबाखूची तस्करी

पारडी येथे रचला सापळा ; कोरपना पोलिसांची धडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 अवैध धंद्यावर कोरपना पोलीस ॲक्शन मोड मध्ये येऊन कारवाई करत आहे. यातच होंडा एक्टिवा वाहना द्वारे स्कूल बॅग मध्ये टाकून सुगंधीत तंबाखूची तस्करी करणाऱ्या दोन इसमांना गुरुवार दिनांक सातला सकाळी साडेआठ वाजता दरम्यान पारडी येथे ताब्यात घेण्यात आले.

सुगंधीत तंबाखू वाहतुक कार्यवाही बाबत पेट्रोलिंग करीत असताना, मिळालेल्या गुप्त माहिती नुसार तेलंगणा राज्यातील बेला येथून होंडा एक्टिवा वाहन क्रमांक एम.एच. २७ डी के ६४४२ या वाहनाने दोन इसम अवैधरित्या सुगंधीत तंबाखू गडचांदुर येथे जात आहे. अशी माहिती मिळाली असता, कोरपना – आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पारडी येथे मिळालेल्या वर्णनानुसार गाडी थांबून झडती घेतली असता., एका काळ्या कलरच्या स्कूल बॅगमध्ये इगल हुक्का तंबाखू २० नग पॉकेट किंमत सहा हजार दोनशे सह होंडा एक्टिवा वाहन अंदाजी किंमत पन्नास हजार असा एकूण ५६ हजार दोनशे रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी प्रवीण भोलेशवर मंडाले (२८), मोहम्मद जिक्रान मो मीनहाज सिद्दीकी (१९) दोन्ही राहणार पांढरकवडा जिल्हा यवतमाळ यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर कलम ३२८ ,१८८,२७२,२७३,३४ भादवी सह कलम २६ (२) अ ३०(२),३,४,९ अ अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ सह कलम १३०/१७७ मोवाका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कोरपना चे पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांचे नेतृत्वात पोलीस कर्मचारी गणेश डवरे, मंचक देवकते, नामदेव पवार व कोरपना पोलिसांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये