ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात जि. प. टेकामांडवा शाळा द्वितीय

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांमध्ये जि. प. उच्च प्राथमिक केंद्रशाळा टेकामांडवा तालुक्यातून द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.

      जिवती पासून १२ कि.मी.अंतरावर असलेली शाळा तालुक्यातून द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरल्यामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.गुणवत्तेची कास धरत या शाळेने मागील काही वर्षांपासून शाळेला गुणवत्तेत पुढे आणले आहे.मुख्याध्यापक, शिक्षक यांनी परिश्रम घेत शाळेचा गुणात्मक दर्जा उत्तम ठेवला आहे. लोकसहभाग,माजी विद्यार्थ्यांचा सहभाग, शाळा व्यवस्थापन समिती सहभाग आणि संवर्ग विकास अधिकारी डॉ.भागवत रेजीवाड, हेमंत भिंगारदेवे, धनराज आवारी गटशिक्षणाधिकारी सुनिल झोडे, अण्णा आडे,केंद्रप्रमुख किसन बावणे,बीआरसी,पंचायत समिती यांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन मुख्यध्यापक पवार विषय शिक्षक दिपक गोतावळे,सहशिक्षक रुपेश मांदाळे,उषा डोये,मुखळा मलेलवार यांच्या अथक परिश्रमामुळे शाळा प्रगती पथावर आली आहे.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शामराव सुरणर, उपाध्यक्ष साकरुबाई गायकवाड, सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामपंचायत टेकामांडवा,  यांनी नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी सहकार्य केले.याबद्दल सरपंच शुभांगी राऊत, उपसरपंच भीमराव कंचकटले व सर्व ग्रामपंचायत सदस्य, सचिव आणि समस्त गावकरी तसेच माता पालकांनी शिक्षकांचे कौतुक केले.

  शाळेची रंगरंगोटी, सुविचार, वर्ग सजावट,क्रीडांगण, परसबाग,वाचनालय, गुणवत्ता पुर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या विकासासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा,नवोदय,शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांची प्रगती,बाल आनंद मेळावा, मेरी माटी मेरा देश उपक्रम,आजादी का अमृत महोत्सव उपक्रम, नवरत्न स्पर्धेतील सहभाग, ग्रामस्थांचा सहभाग,शाळेला केलेली आर्थिक मदत, माजी विद्यार्थी यांच्याकडून वस्तूरुपाने मिळालेले आर्थिक सहकार्य,स्वयंसेवी संस्था मॅजिक बस व सिके यांचे सहकार्य, व वरचेवर मिळत असलेला  लोकसहभाग या सर्वांच्या सहकार्याने हे सर्व शक्य झाले.

येत्या काळामध्ये जि प उच्च प्राथमिक केंद्र शाळा टेकामांडवा एक मॉडेल शाळा बनणार आहे असे येथील शिक्षकांनी मत व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये