ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आंबेडकरी कार्यकर्त्यांनी धर्मांधशक्तींचा नायनाट करण्यासाठी सज्ज राहावे

रिपाइं (ए) चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांचे आवाहन!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

बहुतांशी विदर्भात भाजप व त्यांच्या समर्थकांना ग्राउंड वरचा असंतोष,खदखदत दिसतोय.राज्यात भाजपचे सरकार येणार की नाही ? सोबतच केंद्रात मोदी परत येतील की नाही? अशी रास्त शंका भाजपमध्ये आहे.

लोकसभेसाठी ‘४०० के पार घोषणा भाजप समर्थकांसाठी भाजपा व त्यांचे मित्र पक्ष नेते देत आहे.आपली कोअर व्होटबँक हवालदिल होऊ नये यासाठी भाजप चे प्रयत्न आहे.किमान महाराष्ट्र राज्यात व केंद्रात मोदी आत्मविश्वासाचे सरकार पुन्हा यावे यासाठी मीडिया आणि समाजमाध्यमांवर उलटी हवा केली जात आहे.त्यामुळे रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी व आंबेडकरी विचारवंत,कार्यकर्त्यांनी धर्मांधशक्तींचा नायनाट करण्यासाठी सज्ज राहावे.सत्तेच्या राजकारणाच काय होईल ते होईल,तिथ आपली भूमिका मर्यादित आहे.सांस्कृतिक राजकारणात,समाजकारणात आपली जबाबदारी मोठी आहे.

 असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर समता नगर,वर्धा येथील बैठकीला संबोधित करताना म्हणाले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.दिपक निकाळजे यांच्या निर्देशानुसार व राष्ट्रीय महासचिव मा.मोहनलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाने दिनांक २९ फेब्रुवारीला नुकतीच समता नगर,वर्धा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) ची कार्यकर्ता कार्यशाळा व चिंतन बैठक विदर्भ प्रदेश तथा वर्धा जिल्हा अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली.या बैठकीला विदर्भ प्रदेश महासचिव भिमराव डोंगरे,विदर्भ प्रदेश (पश्चिम) अध्यक्ष संतोष इंगळे,विदर्भ प्रदेश (पुर्व) अध्यक्ष आर.एस.वानखेडे,नागपुर जिल्हा अध्यक्ष दुर्वास चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांनी सुध्दा बैठकीला संबोधित केले.

पुढे बोलतांना रिपाइं नेते मुनेश्र्वर म्हणाले की, भाजपच्या उलट्या बोंबामुळे रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी विचलित होण्याचे कारण नाही.

विदर्भात ११ पैकी एकही लोकसभेची जागा भाजप व एनडीए जिंकणार नाही.भाजपला २०० च्या पुढे गाडी नेणे आव्हानात्मक आहे.म्हणूनच विरोधी पक्षातील नेत्यांवर दबाव टाकून त्यांना भाजप फोडत आहेत.जे शरण येत नाहीत त्यांच्यावर महाराष्ट्रात ईडी कारवाई चालू आहे.

वर्धा व देवळी मतदारसंघातील एमआयडीसी चा प्रश्न गंभीर आहे.या गांधी जिल्ह्यात विधिमंडळात व संसदेत भूमिका मांडनारा खासदार व आमदार दिसत नाही, येथिल एमआयडीसी निस्तेज आहे.मात्र सरकारकडून फक्त आश्वासन देण्यात येत असुन येथे औद्योगिक विकास संदर्भात कोणताही मोठा निर्णय झालेला नाही.या बाबतीत फक्त राजकरण होत असून वर्धा जिल्हातील युवांचे भविष्य एमआयडीसी च्या दुर्लक्ष्यामुळे अंधकारमय झाले आहे.राज्यातील शेतकरी आत्महत्या, गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, पीकविमा,शेतमालाला मिळणारा तुटपुंजा भाव या प्रश्नांकडे विधानसभेत विरोधी पक्षनेते व भाजप सरकारचं लक्ष नाही.असेही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे विदर्भ अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर हे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी संवाद करतांना म्हणाले.

बैठकी मध्ये विदर्भातील रिपाइं (आंबेडकर) चे सयाजी शिंदे,मारुति रोकडे,कुवरलाल रामटेके, विजय लांजेवार, गुप्तमन्यु मेश्राम, नरेंद्र ढोणे, के.एस.आवळे, देवेन्द्र सिरसाट, रविन्द्र ढोणे, अरुण मेश्राम, कृष्णा गवईकर, सिध्दार्थ पाटील,विनोद हिवराले, बालु बोरकर,अजय वरघट, कैलाश बोरकर, प्रदिप तायड़े, सागर सिरसाठ,सुधिर सहारे,सुभाष कांबले, समाधान पाटील, सुनिल वणकर,निलेश मेश्राम,धिरज मेश्राम,कचरु गायकवाड़, प्रविण ढोके, श्रीकृष्ण गायकवाड़, धिरज चंदनशिवे, भावेश सहारे, मनोज जांभुळकर,श्रीकृष्ण गायकवाड़ आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये