ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विदर्भ महाविद्यालयात पोस्टर स्पर्धेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवती येथील विज्ञान विभागाद्वारे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांकरिता पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत सहभाग नोंदवून विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत नवीन नवीन झालेल्या उत्क्रांतीतील पोस्टर बनवून त्याची सखोल माहिती प्रदर्शित करुन विज्ञानाच्या बऱ्याच गोष्टींवर प्रकाश टाकला.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. संजय देशमुख हे होते. मंचावर महाविद्यलयाचे प्रा. गजानन राउत, प्रा. गंगाधर लांडगे, प्रा. डॉ. श्रीकांत पानघाटे, प्रा. महेंद्र साबळे उपस्थित होते. “विज्ञानाशिवाय माणसाची प्रगती होउ शकत नाही, विज्ञान मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो.” असे प्रा. देशमुख यांनी अध्यक्षस्थानी बोलतांना सांगितले. डॉ. पानघाटे यांनी शास्त्रज्ञांच्या जीवनावर प्रकाश टाकून विज्ञानाचे महत्व सांगितले. प्रा. वासाडे, प्रा. साबळे यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयावर पोस्टर प्रदर्शित केले. उत्कृष्ट पोस्टर व सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालया मार्फत सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम आयोजन व यशस्वी करण्याकरीता मा. प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिनेश दुर्योधन यांनी केले. संचालन डॉ. वैशाली डोर्लीकर यांनी केले तर आभार डॉ. परवेझ अली यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्रा. सचिन शिंदे, प्रा. करण राठोड, प्रा. प्रफुल ताडाम, प्रा. गणेश कदम, प्रा. राहुल सदुलवार, प्रा.डॉ. योगेश खेडेकर, प्रा.सचिन यनगंदलवार, प्रा.अमित बोरकर तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये