ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्व. सुशीलाबाई रामचंद्राराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली, चंद्रपूर येथे व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न

चांदा ब्लास्ट

सर्वोदय शिक्षण मंडळाद्वारा संचालित स्व. सुशीलाबाई रामचंद्रारव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पाडोली, चंद्रपूर येथे विद्यार्थी विकास विभाग गोंडवाना विद्यापीठद्वारा एम एस डब्ल्यू प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यासाठी दिनांक 20 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी पर्यंत व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. नरेंद्र टिकले सर माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संदीप सुखदेवे सर व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. देवेंद्र बोरकुटे सर व व्यक्तिमत्व कार्यशाळेच्या समन्वयिका प्रा. डॉ. ममता ठाकुरवार मॅडम व महाविद्यालयातील प्रा. संतोष आडे सर व प्रा. नितीन रामटेके सर यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेच्या समन्वयिका प्राध्यापक डॉक्टर ममता ठाकूरवार मॅडम यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकेतून पाच दिवसीय व्यक्तिमत्व कार्यशाळेचे आयोजन कशा प्रकारे केलेले आहे त्याबद्दल माहिती दिली व कार्यशाळा घेण्यामागचा उद्देश काय आहे यावर सुद्धा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक नरेंद्र टिकले सर यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी व त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी व ज्ञानाची भर होण्यासाठी कार्यशाळा कशा उपयुक्त ठरतात यावर मार्गदर्शन केले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा समदुरकर या विद्यार्थिनीनी केले.

या व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेसाठी दी. 21 फेब्रुवारी 2024 ला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा श्री. श्याम हेडाऊ सर उपस्थित होते त्यांनी “व्यक्तिमत्व विकासा करिता ध्येय निश्चित संदेशवहन आत्मविश्वास व वेळेचे व्यवस्थापन” या विषयावर मार्गदर्शन केले. दि. 22 फेब्रुवारी 2024 मा. श्री. स्वप्नील मेश्राम यांनी “युवा आणि सोशल मीडिया” व मा. श्री. अनिकेत दुर्गे यांनी “मी असा घडलोय” या विषयावर मार्गदर्शन केले दि. 23 फेब्रुवारी 2024 ला मा. श्री. जगदीश नांदुरकर सर यांनी “नाट्य व पटनाट्य” या विषयावर मार्गदर्शन केले.

दिनांक 24 फेब्रुवारी 2024 ला मा. श्री. जेबा पॉल यांनी “Swot analysis Professional skills to Exce social work doman” या विषयावर मार्गदर्शन केले. व दि. 25 फेब्रुवारी 2024 ला मार्गदर्शक म्हणून मा. श्री. मनीष तिवारी सर उपस्थित होते त्यांनी “Basic soft skills for social workers” या विषयावर मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांच्या विकास व त्याच्या मध्ये असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी विद्यार्थी विकास विभाग गोंडवाना विद्यापीठद्वारे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले करण्यात आले स्व. सुशीलाबाई रामचंद्राराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ जयश्री कापसे मॅडम यांच्या नियंत्रणाखाली व कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. देवेंद्र बोरकुटे सर व प्रा. डॉ.ममता ठाकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली या व्यक्तिमत्व विकासाच्या कार्यशाळा संपन्न झाल्या.

समारोपीय कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. मनीष तिवारी सर उपस्थित होते. व प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्रा. किरणकुमार मनुरे सर उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेतून जे अनुभव मिळाले त्यावर अतुल परचाके व रोहिणी चिकनकर या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनवर्षा नागोसे या विद्यार्थिनी ने केले तर आभार प्रदर्शन व कार्यक्रमाचा शेवट सुषमा समदूरकर या विद्यार्थिनीने केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये