ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दीक्षाभूमीच्या विकासासाठी घोषित ५६ कोटी ९० लक्ष रुपयांच्या अंतिम टप्यात असलेल्या निविदेला मंजूरी द्या – आ. जोरगेवार

अधिवेशनात बोलताना केली मागणी

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर दिक्षाभुमीच्या विकासासाठी ५६ कोटी ९० लक्ष रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. हा प्रस्ताव शेवटच्या टप्यात असुन असुन तात्काळ सदर कामालाच्या निविदेला मंजुर प्रदान करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना केली आहे.

       चंद्रपूर येथील पवित्र दिक्षाभुमीच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. सदर विकासकामासाठी १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. दरम्यान या कामासाठी ५६ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधीची घोषणा करण्यात आली असुन सदर प्रस्ताव अंतिम टप्यात आहे. मात्र आमची मागणी १०० कोटी रुपयांची होती. यातील केवळ ५७ कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित निधीही मंजूर करण्यात यावा अशी मागणी अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

       यावेळी बोलताना ते म्हणाले कि, नागपूर नंतर केवळ चंद्रपूरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिक्षा दिली. नागपूर येथील दिक्षाभुमीचा विकास झाला. मात्र चंद्रपूर येथील दिक्षाभुमीचा अपेक्षित असा विकास झालेला नाही. त्यामुळे सदर दिक्षाभुमीचा विकास करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे असेही ते यावेळी म्हणाले.

        चंद्रपूर सह सर्व विज उत्पादक जिल्हांना घरगुती वापरातील २०० युनिट विज मोफत देण्यात यावी ही मागणी पुन्हा एकदा अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. यावर बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, जगातील सर्वात प्रदूषित असलेली थर्मल एॅनर्जी आम्ही निर्माण करतो. परिणामी प्रदुषण वाढत आहे. चंद्रपूर जिल्हाचा विचार केल्यास २०२३ मध्ये ३० दिवसांपैकी ३० दिवस प्रदूषित होते. त्यामुळे श्वसनाचे, हृदयाचे आजार निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेता प्रदूषण नियत्रंण स्मॉग टावर उभारण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. सोबच उपमुख्यमंत्री यांनी सोलर एनर्जी च्या माध्यमातुन ३०० युनिट मोफत देण्याची घोषणा केली आहे. मात्र या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. त्यामुळे सर्व विज उत्पादक जिल्हांना २०० युनिट विज मोफत द्यावी अशी मागणी त्यांनी पून्हा एकदा अधिवेशनात केली आहे. सुरजागड येथे सर्वोतम दर्जाचे लोहखनिज मिळाले आहे. त्यामुळे लोहखनिजवर आधारीत उद्योग चंद्रपूरात सुरु करण्यात यावे असेही योवेळी ते म्हणाले.   

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये