ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निमणी येथे हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

लोकवर्गणीतून हनुमान मंदिराची निर्मिती 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

      येथून जवळच असलेल्या निमणी येथील मागील ७० वर्षांपूर्वी बांधलेले एकमेव स्लॅबचे हनुमान मंदिर जीर्णोद्धार झाल्याने लोकवर्गणीतून नव्याने हनुमान मंदिराची निर्मिती करून २६ फेब्रुवारी ते ३ मार्च पर्यंत भव्य श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ व हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळस स्थापना ह भ प भागवताचार्य प्रशांत भोयर महाराज यांच्या हस्ते ३ मार्च ब्रह्म मुहूर्तावर पहाटे चार वाजता होणार आहे

       यावेळी ह भ प आकाश ताविडे खुशाल गोहोकार गायक सूर्यभान गुंजेकर पुरुषोत्तम पेटकुले आर्गन वादक देवेंद्र दिघोरे तबला वादक रोहीत सुरकर रामदास ताविडे आदी उपस्थित राहणार आहे

     रोज सकाळी सहा वाजता ध्यानपाठ करून हनुमान मंदिरापासून निघालेल्या रामधून कलश यात्रेत भजन करून नाचत-गाजत महिला मोठ्या संख्येने डोक्यावर कलश घेऊन उत्साहात रोज रामधून निघत असून स्वागतासाठी सर्वांनी रस्त्याची स्वच्छता करून रांगोळी टाकून छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रसंत गाडगे महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गौतम बुद्ध गजानन महाराज सदगुरू जगन्नाथ महाराज विठ्ठल रुक्मिणी यांचे फोटो ठेऊन पूजन करण्यात येत आहे ह भ प भागवताचार्य प्रशांत भोयर महाराज म्हणाले की श्रीमद भागवत कथा ही मानवासाठी एक परिपूर्ण मार्गदर्शक आहे आणि जो त्याच्या शिकवणीनुसार वागतो त्याला कधीही कोणतीही समस्या येत नाही परंतु तो सांसारिक बंधनांवर मात करून जीवनात परिपूर्णता प्राप्त करत असे सांगितले रोज सायंकाळी सामुदायिक प्रार्थना हरिपाठ सुरू असून २ मार्चला सायंकाळी ७ वाजता ह भ प आकाश ताविडे यांचे किर्तन असून निमणी परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये