गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा नागरी सहकारी अधिकोश (बॅंक) मर्यादीत वर्धा यांचे बॅंक अकाऊंट हॅकींगचा गुन्हा उघड

पुढील तपास प्रगतीपथावर 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 24.05.2023 रोजी दररोज प्रमाणे 10.00 वाजता वर्धा नागरी सहकारी बॅंकेत नियमीत कामकाज सुरू झाले. माधवभवन येथील कुमारप्पा शाखेच्यावर असलेल्या मुख्य कार्यालयातून जिल्हयात पसरलेल्या एकूण 13 शाखांचे विविध बॅंक व्यवहार सुरळीत चालू होते. आर.टी.जी.एस. एन.ई.एफ.टी.च्या सर्व व्यवहारांसाठी मंजूरी नेहमीप्रमाणे मुख्य कार्यालयातून थेट नागपूरच्या येस बॅंकेत संगणकाद्वारे पाठविण्यात येवून दैनंदीन व्यवहार सुरू होते.

अंदाजे दुपारी 02.45 दरम्यान आर.टी.जी.एस. एन.ई.एफ.टी.चे व्यवहारास मंजूरी देणा-या अधिका-यांना बॅंक खात्यामध्ये तफावत दिसून आली. त्यामूळे त्यांनी तपासणी केली असता जवळपास सव्वा करोड रूपये कमी दिसत असल्याने वर्धा नागरीच्या मुख्यालयात एकच गडबड उडाली. मुख्यालयाचे वरिष्ठ अधिकारी व शाखा व्यवस्थापक यांना माहिती देण्यात आली. त्यांनी नागपूर येथील येस बॅंकेतील अधिका-यांषी संपर्क केला. वर्धा नागरी बॅंकेला तांत्रीक सेवा पूरविणा-या वेगवेगळया 3 कंपन्यांना संपर्क केला पंरतू कूठलीही माहिती मिळत नव्हती. फक्त एकच माहिती ठोस होती ती म्हणजे नागरी बॅंकेच्या येस बॅंक येथे असलेला सेटलमेंट खाते क्रमांक 00287700000581 मधून कोणतरी अज्ञाताने ऑनलाईन पद्धतीचा वापर करून अनाधीकृत आर टी जी एस व्यवहार केले व एकुण 1,21,16,004/-रु एवढी रक्कम तांत्रीकरीत्या चोरून नेली.

नागरी बॅंक व येस बॅंक यांनी एक बॅंक म्हणून सर्व माहिती काढली व त्यांच्या-त्यांच्या स्तरावर ज्या-ज्या बॅंकामध्ये रक्कम गेली अश्या एकूण 24 बॅंकाना ई-मेलद्वारे संपर्क केला. परंतू जी माहिती समोर आली त्याप्रमाणे एका अकाऊंटमध्ये ढोबळमानाने 5 लाख रूपये अषी रक्कम मणीपूर, मिझोराम, कर्नाटक, दिल्ली, पश्चीम बंगाल, तेलंगाणा, आसाम, त्रीपूरा, हरीयाणा, उत्तरप्रदेष देषाच्या विविध राज्यातील एच.डी.एफ.सी., एस.बी.आय., बॅंक ऑफ बरोडा, डेव्हलपमेंट बॅंक, कर्नाटक बॅंक, फेडरल बॅंक, यूको बॅंक, पंजाब अॅन्ड सिंध बॅंक, इंड्सइंड बॅंक, पंजाब नॅषनल बॅंक, अॅक्सीस बॅंकांच्या अकाऊंटमध्ये 24.05.2023 च्या पहाटे 06.00 ते 08.30 वाजता दरम्यान ट्रान्सफर झाल्याचे निदर्षनास आले. नागरी बॅंकेने त्यांच्या स्तरावर कोर बॅंकीग सॉफ्टवेयर पुरविणारी कंपनी निलेटो, फायरवॉल पूरविणारी कंपनी सोपॉस व सेटलमेंट बॅक म्हणून काम करणारी येस बॅंक मुख्य षाखा मुंबईषी वारंवार संपर्क करून अधिकाधीक माहिती घेण्याचा प्रयत्न केला, परंतू सर्व व्यर्थ. ही चोरी कषी झाली याबाबत कोणालाच काही सुगावा लागेनासा झाला. दिनांक 24.05.2023 व 25.05.2023 असे 2 दिवस पुर्ण शहानिषा केल्यावर 25.05.02023 ला संध्याकाळी नागरी बॅंकेचे व्यवस्थापक व इतर संबंधीत अधिकारी यांनी प्रथमथः पोलीस अधिक्षक कार्यालय व तेथून पोलीस स्टेषन वर्धा षहर गाठले.

फिर्यादी श्री. कांचन अनिल केळकर, बॅंक व्यवस्थापक, वर्धा नागरी बॅंक, वर्धा यांनी फिर्याद दिली कि, त्यांचे बॅंकेतील सी.बी.एस. (कोर बॅंकींग सिस्टीम) व बॅंकेतील इतर तांत्रीक यंत्रणा बंद असतांना 24.05.2023 चे सकाळी 06.00 ते 08.30 वाजता दरम्यान कोणतीरी अज्ञाताने ऑनलाईन पद्धतीने हॅकिंगचा वापर करुन एस बॅंक येथे असलेला सेटलमेंट खाते क्रमांक 00287700000581 मधुन एकुण 1,21,16,004/-रु ची रक्कम अनाधीकृत आर.टी.जी.एस. व्यवहार द्वारे काढून घेतली. अषा फिर्यादीचे लेंखी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेषन वर्धा षहर येथे अपराध क्रमांक 606/2023 कलम 420 भादवि सहकलम 43(ंअ), 66(ड) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

गुन्हयाची गंभीरता लक्षात घेता, मा. पोलीस अधिक्षक वर्धा श्री. नूरूल हसन यांनी स्वतः वर्धा नागरी बॅंकेला भेट देवून प्रकरणाची हकीकत समजावून घेतली तसेच नागरी बॅंकेतील तांत्रीक उपकरणांची पाहणी केली. बॅंकेचे व पोलीस यंत्रणेच्या वरीश्ठ अधिकारी यांना गुन्हयासंबंधाने मार्गदर्षन केले. सायबर तपासासंबंधाने सायबर पो.स्टे.ला मार्गदर्षन केले व त्यांचेच निर्देषाप्रमाणे पुढील तपास करण्यात आला. गुन्हयाचे स्वरूप व व्याप्ती पहाता 4 पथके तयार करण्यात आली.

वरीश्ठ मार्गदर्षन मा. पोलीस अधिक्षक वर्धा श्री. नूरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक डॉ. श्री. सागर रतनकूमार कवडे, पो.नि. सत्यवीर बंडीवार, पो.स्टे. वर्धा शहर, पो.नि. संजय गायकवाड, स्था.गु.षा. वर्धा.

1) वर्धा येथे तांत्रीक तपास यंत्रणा:- स.पो.नि. संदीप कापडे, पो.हवा. कुलदीप टांकसाळे, पो.ना. दिनेष बोथकर, म.पो.हवा. मिना कौरती, म.ना.पो.षि. षाहीन सय्यद, स्मीता महाजन, सायबर सेल वर्धा अनूप राऊत पो.स्टे. वर्धा शहर

2) बंगलोर तपास पथक:- पो.उप.नि. सलाम कुरेषी, पो.हवा. दिनेष तुमाने, ना.पो.षि. विषाल मडावी, पो.षि. अंकीत जिभे, राहूल भोयर

3) मुंबई तपास पथक:- पो.उप.नि. गणेश बैरागी, पो.हवा. निलेश कट्टोज़वार, ना.पो.षि. अनूप कावळे, किशोर बमनोटे, अरविंद घुगे, पो.षि. राजेश डाळ, राजेश ढगे

4) दिल्ली तपास पथक:- स.पो.नि. सदाषीव ढाकणे, पो.उप.नि. अमजद पठाण, ना.पो.षि. अक्षय राऊत, गोवींद मुंडे, पंकज भरणे, प्रषांत वंजारी, पो.षि. वैभव जाधव

5) हैद्राबाद तपास पथक:- पो.उप.नि. मोहन धोंगडे, पो.षि. सुरज जाधव, पो.स्टे. वर्धा शहर

वर्धा येथील तांत्रीक तपास यंत्रणा:-

येस बॅंक नागपूर येथून गुन्हयातील 24 विवादीत ट्रान्सफर बाबत रजीस्टर्ड आय.पी. अॅड्रेस व मॅक आयडी लॉगीन्स् डिटेल्स्, यूझर डिटेल्स् यांची तांत्रीक माहिती प्राप्त करण्यात आली. कोर बॅंकीग सॉफ्टवेयर पुरविणारी कंपनी निलेटो, फायरवॉल पूरविणारी कंपनी सोपॉस, इंटरनेट पूरविणारी कपंनी रेलवायर यांची चौकषी करण्यात आली. आरटीजीएस व्यवहार होत असलेले कॉम्प्यूटर, सीबीएस सर्व्हर, एस.क्यू.एल. सर्वर, एस.एम.एस. सर्व्हर, कार्यालयातील इतर कॉम्प्यूटर यांची तज्ञामार्फत पडताळणी करण्यात आली. नागरी बॅंकेमध्ये असलेल्या सी.सी.टी.व्ही.ंची तपासणी करण्यात आली. आर.बी.आय. यांचे 5 दिवस चाललेल्या निरीक्षणादरम्यान त्यांचेसोबत राहून तांत्रीक बाबी व बॅंकांकडून संगणकीय व इंटरनेट माध्यमांनी झालेल्या चुकांबाबत सखोल माहिती घेण्यात आली.

गुन्हयात आतापावेतो 24 मूख्य बॅंक अकाऊंट व्यतीरीक्त इतर बॅंक अकाऊंट व यु.पी.आय. आयडी असे एकूण 50 ते 60 पेक्षा जास्त अकाऊंट लिंक तपासादरम्यान प्राप्त झालेले आहे. सर्व बॅंक अकाऊंट सीझ करण्यात आले आहेत. गुन्हयातील 23 लाख 10 हजार रूपये थांबविण्यात पोलीस यंत्रणेला यष आले आहे.

निश्पन्न तथ्य:- घटना रात्री दरम्यान आरोपींनी सी.बी.एस. सॉफ्टवेयर, एस.एम.एस. पोर्टल आणि येस बॅंकेचे एस.एम.एस. पोर्टल यांचे यंत्रणेमध्ये फेरफार करून (हॅकींग) अटॅक करून हे आर.टी.जी.एस. ट्रान्झॅक्षन केलेले आहे. ज्या व्यक्तीला या सर्व संगणकीय यंत्रणांबद्यल ज्ञान अवगत आहे अषीच व्यक्ती या सर्व प्रकाराची मास्टरमाईंड आहे त्या पध्दतीने तपास करून यामध्ये नायजेरीन फ्रॉडचे संबंध निश्पन्न करण्यात आले व बंगलोर येथून आरोपी अटक करण्यात आले.

सदर गुन्हयात रक्कम वळती झालेले क्रीश्णा इंटरप्रायझेस यांचे नावाने असलेल्या बंगलोर येथील अकांऊटवरून मुंबई येथील ए.टी.एम. द्वारे रक्कम काढण्यात आली होती. त्याप्रमाणे पथकाने सी.सी.टी.व्ही. फूटेज प्राप्त केले व यामध्ये एकूण 5 आरोपी वेगवेगळया ठिकाणाहून रक्कम काढत असल्याचे निश्पन्न केले.

मुळ बॅंक अकाऊंट सोबतच एक आणखी एयू स्मॉल फायनान्स बॅंक येथील खाते षोधून त्याचे कागदपत्र प्राप्त करण्यात आले. त्यावरून सदर आरोपीचे नांव रामप्रसाद नारायणा अॅले, राह. कौरटाला मंडमलम, कोराटीया, करीमनगर, तेलंगणा आंध्रप्रदेष येथील असल्याचे निश्पन्न झाले. अथक षोध व परीश्रमाअंती स्थानीक पोलीसांचे मदतीने दिनांक 06.06.2023 चे रात्र दरम्यान 1) शंकर इदुकोण्डलू केसांना, वय 40 वर्ष, रा. हाफिसपेठ, हैद्राबाद, तेलंगाणा, 2) चंदू रमनया पारुचूरू, वय 30 वर्ष, रा. गुडूर, जिल्हा नेल्लोर, आंध्रप्रदेश यांचा आचोळे पोलीस स्टेषन, मिरा भाईंदर येथून ताब्यात घेण्यात आले.

सदर आरोपीतांची गुन्हयातील भूमीका:- (रक्कम संपविणारा दुवा)

1. मागील 3 ते 4 महिन्यांपासून यातील इतर गुन्हेगारांमार्फत गुन्हयास आवष्यक अषा सर्व लिगल कागदपत्रे असलेल्या व्यक्तींचा षोध घेण्यात आला.

2. या व्यक्तींनी आर्थीक लाभाचे लोभार्थ विविध 12 ते 15 बॅंकामध्ये स्वतःचे अकाऊंट काढले.

3. त्याचे एटीएम, चेक बूक व इतर कागदपत्रे आपल्या पत्यावर (हैद्राबाद व आंध्रप्रदेष) मागविली.

4. गुन्हयाचे 1 दिवसापूर्वी ट्रेन व विमानाने मंुबई येथे आले.

5. रक्कम अकाऊंटवर येताच वरळी व भायखला येथील ए.टी.एम. मधून रक्कम काढली व काही रक्कम चेक द्वारे किंवा यू.पी.आय./आर.टी.जी.एस. द्वारे दुस-या अकाऊंटला ट्रान्सफर केली.

6. बॅंक अकाऊंट रिकामे करून त्यांचे वाट्याला आलेली गुन्हयातील रक्कम संपवीली.

दिल्ली. ( 25 बॅंक खाते व 23 सिमचा धारक असलेली व्यक्ती व त्याचे वरील लिंक अटकेत)

येस बॅकेकडून प्राप्त माहितीनुसार सदर गुन्हयातील रक्कम हि दिल्ली येथील वेगवेगळया 06 बॅंक खात्यात वळती करण्यात आली असल्याने त्या बॅंकेषी पत्रव्यवहार करून माहिती प्राप्त करण्यात आली. दिल्ली येथील तपास पथकाने सी.सी.टी.व्ही. फूटेज व इतर इत्यंभूत अभ्यास करून सदरची व्यक्ती ही करोल बाग व सराय रोहीला या परीसरात रहात असल्याचे निश्पन्न केले. अॅक्सीस बॅंकेचे सी.सी.टी.व्ही. फूटेज वरून चेहरा ओळख करून षिताफीने व्यक्तींचा षोध घेण्यात आला. 6 दिवसांचे अथक षोधानंतर अॅक्सीक बॅंक खाते नावावर असलेला व्यक्ती सतीष कुमार जयस्वाल षोध घेवून प्रथमतः त्याचे नावावरील सर्व 6 वेगवेगळया बॅंक खात्यांची माहिती घेण्यात आली व त्याचे नावावर 20 पेक्षा जास्त सिमकार्ड असल्याचेही तांत्रीक तपासात निश्पन्न झाले. व्यक्तीचे चेह-यावरून त्याचा षोध घेवून सतिष कूमार जैसवाल, रा. हाउस नं. 953/956 नाई वाला करोल बाग, सेंट्रल दिल्ली यांस ताब्यात घेण्यात आले.

सदर व्यक्तीची सखोल विचारपूस केली असता त्याचेवर 2 व्यक्ती ज्यांची नावे तो विनोद व अभिशेक सांगतो. सुरेष यांचे सोबत वेगवेगळया बॅंकांमध्ये व सीमकार्डचे दुकानात जावून त्याचे नावावर बॅंक खाते व सीम कार्ड घेत. त्याने दिलेल्या अधीक माहितीवरून त्या परीसरात अहारोत्र षोध घेवून विनोद जमूना पासवान, वय 42 वर्शे, रा. रामदाना, थाना अतरी, पोस्ट बैरका, तहसील फिगरसराय, जि. गया, बिहार ह.मू. गली नं. 2, ईस्ट मोतीबाग, सराय रोहीला, नवी दिल्ली यांस ताब्यात घेण्यात आले.

सदर आरोपीतांची गुन्हयातील भूमीका:- (जामतारा, बिहार कनेक्षन)

1. सुरेष जयस्वाल याचे 25 बॅंक अकाऊंट व अंदाजे 23 सिमचा धारक आहे.

2. डी.बी.एस. मंुबई, इंडीयन ओव्हरसीज बॅंक, आग्रा, आर.बी.एल. बॅंक दिल्ली अषा इंटरनॅषनल बॅकमध्ये त्यांचे अकांऊट आहेत.

3. विनोद पासवान हा मुळचा बिहार येथील असून त्यांचे संपर्कातील अनेक व्यक्ती जामतारा येथे असल्याचे निश्पन्न झाले आहे.

बंगलोर (बेंगालूरू) (सर्व गुन्हयाचा प्रारंभ – नायजेरीयन कनेक्षन)

येस बॅकेकडून प्राप्त माहितीनुसार सदर गुन्हयातील रक्कम ही बंगलोरच्या वेगवेगळया 6 अकाऊंटमध्ये गेले होते. येथील वेगवेगळया 05 बॅंक खात्यात वळती करण्यात आली असल्याने त्या बॅंकेषी पत्रव्यवहार करून माहिती प्राप्त करण्यात आली. बंगलोर येथील तपास पथकाने सी.सी.टी.व्ही. फूटेज व इतर इत्यंभूत अभ्यास करून इरॉम जेमसन सिंग हा अकाऊंट धारक निश्पन्न केला. परंतू अधीक माहितीच्या आधारे हे बॅंक अकाऊंट एक आफ्रीकन व्यक्ती वापरत असल्याचे माहिती झाले. सदर व्यक्ती हिंदूस्तान पेट्रोलीयमचे पंपावर ए.टी.एम. स्वाईप करून रक्कम कॅष करीत असे.

बानासवाडी, रामामूर्ती नगर येथे सदर व्यक्तीचे अस्तीत्वाबाबत माहिती मिळाली. परंतू सदर ठिकाणी हजारोंच्या संख्येने आफ्रीकन लोक रहात असल्याने षोधकार्यात फार अडचणींचा पोलीस पथकाला सामना करावा लागला. पुढे वेगवेगळया बॅंकाची माहिती, रस्त्यांवरील सी.सी.टी.व्ही. फूटेज व तांत्रीक माहितीच्या आधारे सदर व्यक्ती उच्चभ्रू अषा चिकापलाप्पा लेआऊट, बंगलोर येथे स्वतंत्र फ्लॅटमध्ये राहत होता. तसेच आफ्रीकन किचन नावाचे मेस मध्ये जेवणास जात होता. सतत 2 दिवस त्याचा अभ्यास करून अथक प्रयत्नाअंती त्यांचे राहते घरून षीबूफे मूओडेबेलू वडील जोसफ, वय 28 वर्शे, नागरीकत्व:- नायजेरीयन सध्याचा पत्ता 133/2, ग्राऊंड फ्लोअर, चिकापूल्लाप्पा लेआऊट, होरमाव्हू, बंगलोर, कर्नाटक, 560043 पासपोर्ट क्रमांक ए03737026 यांस दिनांक 09.06.2023 अटक करण्यात आली. बंगलोर न्यायालयात हजर करून ट्रांझीट वारंट घेवून दिनांक 11.06.2023 रोजी वर्धा येथील न्यायालयात हजर करण्यात आले. सदर आरोपी हा 20.06.2023 पावेतो पोलीस कोठडी रिमांडवर आहे.

गुन्हयातील मास्टरमाईंड पैकी एक

1. दुस-याचे नावाचे वेगवेगळया बॅंकांचे ए.टी.एम. व अकांऊंट जमा करण्याचे काम हा करतो.

2. ईरॉम जेम्सन (गुन्हयातील अकाऊंट) हाच चालवत होता.

3. याचे घरचे इंटरनेट सेवा व वर्धा नागरी बॅंक येथील दिनांक 24.05.2023 रोजी सर्व्हरवर आलेले आयपी पुरविणारी कंपनी एकच असल्याचे गुन्हयाचे तपासात निश्पन्न झाले आहे.

4. सदर आरोपी 2019 पासून भारतात रहात असून बंगलोर मधील नायजेरीयन लोकांचे संपर्कात आहे.

5. आरोपीने त्याचेसोबत असलेल्या इतर लोकांची माहिती सांगीतली असून त्या दिषेने तपास चालू आहे.

6. त्याने रक्कमेची विल्हेवाट कषी लावली याबाबत अधिक तपास चालू आहे.

 

गुन्हयात अद्याप पावेतो

1. वेगवेगळया बॅंकांमधील 23 लाख 10 हजार रूपये थांबविण्यात पोलीसांना यष आले आहे.

2. अटक आरोपीतांकडून विविध बॅंकांचे 16 ए.टी.एम. कार्ड

3. 3 आधार कार्ड

4. 1 इलेक्षन कार्ड

5. नायजेरीयन असोषीएषनचे ओळखपत्र

6. एक्सीटेल कंपनीचे इंटरनेट राऊटर

7. आय.डी.एफ.सी. बॅंकेचे चेकबूक

8. गुन्हयात वापरलेले एकूण 9 मोबाईल

9. व इतर साहीत्य

असे 23,10,000/-रू व वरील प्रमाणे एकूण 1,36,010/-चा माल जप्त करण्यात आला आहे.

पुढील तपास जलद गतीने चालू असून एक पथक हैद्राबाद येथे सद्यस्थीतीत तपासात असून व एक पथक बंगलोर येथे पुनष्च पाठविण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये