ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निर्मल उज्जवल क्रेडिट कोऑपरेटिव सोसायटी लि. नागपुर,शाखा आर्वी नाका वर्धा येथील कर्मचार्यांच्या सहकार्याने मिळाली विम्याची रक्कम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

निर्मल उज्जवल क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी लि. नागपुर शाखा आर्वी नाका वर्धा येथील कर्ज खाते ग्राहाक स्व. कुणाल शेषराव जिल्हारे गाव :- उबादा तालुका – समुद्रपुर जिल्हा – वर्धा यांचे आर्वी नाका शाखेत कर्ज खाते होते त्या कर्ज खात्याची काही हप्ते भरल्या नंतर मध्यंतरी त्यांचे हप्ते स्थगीत अस्यामुळे सोसायटीच्या कर्मचार्यानी त्यांच्या सोबत संपर्क साधला असता त्यांचे अपघाती निधन झाले असे कळले.

त्यानंतर सोसायटीचे कर्मचारी त्यांच्या घरी गेले अस्ता त्यांची पत्नी व आठ महिन्याची छोटी मुलगी होती, तसेच त्यांच्यावर आलेले आकस्मित संकट बघता तेंच्या सोबत कर्जा बद्दल चर्चा न करता सोसायटीचे कर्मचारी तेथुन परत आले. तेथील परीस्थीती पाहुन कर्मचारांच्या मनातील मनुष्य जागा झाला व कर्मचारांनी आपण या परिवारा करीता मद्दत केली पाहिजे असे ठरवीले. लगेच श्री. दिनेश मोकद्दम या कर्मचार्यानी त्यांची लोन केस पडताळुन पाहीली अस्ता त्या लोन केस मध्ये सोसायटी कडुन त्या परिवारास काही फायदा होईल या करीता स्व. कुणाल शेषराव जिल्हारे यांच्या नावाने सोसायटीने बजाज अलायंस कंपनीला ४००/- विमा काढला होता त्याबद्दल विमा कंपनीला लागणारे सर्व कगदपत्रे गोळा करून ते कागदपत्रे विमा कंपनीला पठवले विमा कंपनी ने त्या कागदपत्राची योग्य शाहानिशा करून स्व. कुणाल शेषराव जिल्हारे यांचा अपघाती विमा ३,३०,०००/- ( तिन लाख तिस हजार ) रुपयाची रक्कम बजाज अलॉयन्स विमा कंपनीने मंजुर केली. त्या पैकी निर्मल उज्जवल सोसायटी यांनी आपली कर्ज रक्कम कपात करून उर्वरीत रक्कम २,४०,०००/- रूपये स्व. कुणाल जिल्हारे यांच्या वारस म्हणुन श्रीमति, अर्चना कुणाल जिल्हारे यांच्या खात्यात जमा केली.

या करीता याचे श्रेय निर्मल उज्जवल क्रेडीट को. ऑफ. सोसायटी मुख्यालय नंदवन, नागपुर व बजाज अलॉयंस विमा मधिल कर्मचारी तसेच निर्मल उज्जवल क्रेडीट. को. ऑफ. सोसायटी शाखा आर्वी नाका मधिल शाखा प्रभारी सौ. जयश्री अतुल तिडके कर्मचारी श्री. दिनेश मोकद्दम, श्री. प्रशांत कल्लीरवार, श्री. रोशन मुडे, यांना जाते.

शाखा प्रभारी
सौ. जयश्री अतुल तिडके
निर्मल उज्जवल को ऑप सोसायटी लि. नागपुर.
शाखा:- आर्वी नाका वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये