ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोक अदालतीतून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची महावितरणच्या वीज ग्राहकांना संधी

चांदा ब्लास्ट

    चंद्रपूर परिमंडलंतर्गत चंद्रपूर मंडळ व गडचिरोली मंडळमधील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेले ग्राहक तसेच वीजबिलाबाबत वाद आणि वीज चोरीच्या दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्याची संधी आहे.

 त्यासाठी या ग्राहकांना तालुका न्यायालय स्तरावर रविवारी (०३ मार्च २०२४) आयोजित लोक अदालतीत सहभागी व्हावे लागेल.

 चंद्रपूर परिमंडल कार्यक्षेत्रातील प्रत्येक तालुका न्यायालयात ३ मार्च २०२४ ला दरम्यान राष्ट्रीय आयोजित करण्यात आली आहे.

   चंद्रपूर परिमंडलातील सुमारे २ हजार ग्राहकांना २ कोटी २१ लाख ६३ हजार रुपयांच्या थकीत वसुलीसाठी लोक अदालतीत सहभागी होण्याबाबत विधी विभागाकडून नोटिसेस पाठवण्यात आल्या आहेत. नोटिस मिळाली नसेल तरीही या ग्राहकांना लोक अदालतीत सहभागी होत आपल्या प्रकरणांचा निपटारा करून घेता येईल.

यासाठी संबंधित ग्राहकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील तालुका न्यायालयात आयोजित लोक अदालतीत सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता श्री.सुनील देशपांडे यांनी केले आहे.

      कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेले ग्राहक, वीजबिलाबाबत वाद आणि वीज चोरीच्या दखलपात्र व प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्याची व न्यायालयच्या फेरीपासून मुक्तीची संधी आहे.

  चंद्रपूर परिमंडलांतर्गत

    चंद्रपूर मंडळ – वीज चोरीच्या दाखल १ हजार २५ ग्राहकांकडे १ कोटी ८७ लाख तसेच गडचिरोली – मंडळातील १ हजार ११८ ग्राहकांकडे २ कोटी १७ लाख रक्कम वसुलीसाठी, प्रकरणे दाखल आहेत तर गडचिरोली विभागातील ६ ग्राहकांना १८ विजचोरीच्या प्रकरणाचा निपटारा करून घेण्याची संधी आहे.

    वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार आलापल्ली विभागातील २६ व गडचिरोली विभागातील ५ अशा ३१ विजचोरीच्या ३६ लाख ६६ हजार ( विजचोरीची रक्कम व दंड ) भरून, विजचोर म्हणवून घेण्याच्या बदनामिपासून या लोकअदालतीमधून चांगली संधी प्राप्त झाली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये