ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत 243 प्रकरणांना खेळी मेळीच्या वातावरणात मंजुरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

       तहसील कार्यालय कोरपणा येथे दि 21 फेब्रुवारी ला संजय गांधी निराधार योजना समितीतच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री नारायण हिवरकर (संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष कोरपणा) होते तर प्रमुख पाहुणे प्रकाश वटकर (तहसीलदार ), मनोहर कुळसंगे समिती सदस्य, लक्ष्मीबाई कुळमिथे सदस्या, सुरेश टेकाम सदस्य, नारायण राठोड सदस्य, रंजनाताई मडावी सदस्या,नगरपंचायत अधिकारी,पंचायत समिती अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत संजय गांधी निराधार,श्रावण बाळ, घटस्फोटीत व इतर योजनातिल 243 प्रकरणे मंजुरी साठी ठेवण्यात आली प्रधानमंत्री मोदी सरकार विकासित भारत संकल्प यात्रे अंतर्गत तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांना लाभ मिळावा या हेतूने गावा गावातुन फार्म भरनाऱ्या सर्व लाभार्थ्यांच्या प्रकरनांना मंजुरी देण्यात आली संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ योजना व इतर योजनेतिल पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवुन देण्यासाठी सर्वोतोपरी आमचा प्रयत्न राहील व कोणताही पात्र लाभार्थ्यी या योजने पासून वंचित राहानार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले या बैठकीला मोलाचे सहकार्य श्री ढोबळे बाबु,सौ मालेकार मडम, कुळमेथे यांनी मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये