ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्यमंत्री सुंदर शाळा,स्वच्छ शाळा उपक्रमाअंतर्गत प्रविणभाऊ आडेपवार माध्यमिक विदयालय निफंद्रा तालूक्यातून प्रथम

तिसऱ्या स्थानी विश्वशांती विद्यालय सावली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे दिनांक 30 नोव्हेबंर 2023 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा करीता “मुख्यमंत्री सुंदर शाळा, स्वच्छा शाळा” हे अभियान दिनांक 1 जानेवरी 2024 ते 15 फेब्रूवारी या कालावधीत राबविण्यात आले होते.

  शाळांतील शिक्षक,पालक, विदयार्थी व माजी विदयार्थी यांच्यात शाळेप्रती उतरदायीत्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विदयार्थ्याना शीकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेतर्गंत हे अभीयान राबविण्यात आले.

  या अभीयानासाठी शाळांची विभागणी अ) शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा ब)उर्वरीत इतर व्यवस्थापनांच्या शाळा या दोन वर्गवारीत करण्यात आली.प्राथमिक स्तरापासून राज्यस्तरापर्यत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा व उर्वरीत इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा साठी तालुकास्तर,जिल्हास्तर ,विभाग स्तर,राज्य स्तर असे तीन बक्षीसे ठेवण्यात आले आहे.

         या अभिनयात अ ) विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन व विद्यार्थ्यांचा सहभाग 60 गुण ब ) शाळा व्यवस्थापकाकडून आयोजित उपक्रम व घटकांचा सहभाग 40 गुण असे 100 गुणांची स्पर्धा होती.या स्पर्धेचा तालुका स्तरीय शाळा मुल्यांकनं निकाल जाहीर करण्यात आला या मध्ये खाजगी व्यवस्थापनातून अष्टविनायक बहूउदेशीय शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली व्दारा संचालित प्रविणभाऊ आडेपवार माध्यमिक विदयालय निफंद्रा ने प्रथम क्रमांक मिळविला. त्याबदल शाळेचे संस्थापक विजय आडेपवार, संस्थेचे सचिव रवींद्र आडेपवार, प्रविणभाऊ आडेपवार यांच्या हस्ते मुख्याध्यापक रवींद्र कूडकावार , शाळेचे शिक्षक,

शिक्षकेत्तर कर्मचारी, शाळेचे विदयार्थी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभीनंदन करण्यात आले. या प्रसंगी शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष भक्तदास डहलकर, सदस्या मीनाक्षी फुलझेले,शाळा व्यवस्थापन समीती सदस्या कल्पना ठाकूर उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे संचालन सहा.

शिक्षक गोविदां बुरांडे तर आभार सहा. शिक्षक प्रदीप दोडके यांनी मानले.शिक्षक पालक संघाचे, शाळा व्यवस्थापन समीतीचे, पदाधीकारी यांनी अभींनदन व कौतूक केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये