ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत

शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना शितपेयाचे वाटप

चांदा ब्लास्ट

भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त समाज बांधवांच्या वतीने शहरात शोभायात्रा काडण्यात आली होती.सदर शोभायात्रा गांधी चौक येथे पोहचल्यावर यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना शितपेयाचे वाटप करण्यात आले.

  यावेळी सहायक पोलिस उपनिरिक्षक दिपक चालुरकरयुवा नेते अमोल शेंडेआदिवासी विभागाचे जिल्हा अध्यक्ष जितेश कुळमेथेअल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशिद हुसेनशहर संघटक विश्वजीत शाहाशहर संघटक करणसिंह बैससतनाम सिंह मिर्धाकरण नायरकुणाल जोरगेवारराजिक खानविमल कातकरदर्शन भुरटकरमहेश गोहोकार आदिंची उपस्थिती होती.

   भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त समाज बांधवांच्या वतीने शोभायात्रा काडण्यात आली होती. विश्वकर्मा चौकातून सदर शोभायात्रेला सुरवात झाली. ही शोभायात्रा शहराच्या मुख्य मार्गाने होत एकोरी वार्डातील समाज मंदिरात पोहोचली. येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. दरम्यान शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गांधी चौक येथे स्वागत मंच उभारण्यात आला होता. सदर शोभायात्रा स्वागत मंचाजवळ पोहचताच यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी शोभायात्रेचे स्वागत केले. यावेळी भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन नमन करण्यात आले.

याप्रसंगी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाचे वाटप करण्यात आले. सदर शोभायात्रेत मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये