ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अबब, चक्क आवडत्या “गंगा” नाव असलेल्या गायीचा पहिल्या डोहाळेचा कार्यक्रम

शेतकरी कुटुंबाकडून अभूतपूर्व प्रेरणादायी उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

               आज एकविसाव्या शतकात प्राणी मात्रावर प्रेम करणं, त्यावर जीव ओवाळून टाकणं, मुक्या प्राण्यावर सर्वस्व अर्पण करणं ह्या गोष्टी आपल्याला समाजात वावरताना क्वचितच बघायला मिळत असतात. आपण सोशल मीडियावर बघत असतो छोट्याशा रिल्स साठी मुक्या प्राण्यांच्या जीवावर बेतेल असे विडीओ येत असतात. परंतु यासर्व गोष्टीला बगल देत भद्रावती शहरातील प्रशांत देवराव भोंडे व समिक्षा भोंडे या शेतकरी कुटुंबाने आपल्या लाडक्या गंगा गायीच्या पहिल्या बाळंतपणाचा डोहाळे कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करून प्राण्यामात्रांवर प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठी प्रेरणादायी उपक्रम ठरला आहे. या अनोख्या घटनेची शहरात चर्चा असून नागरिकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.

        भद्रावती शहारातील झिंगुजी वार्ड येथे राहणारे प्रशांत देवराव भोंडे हे शेतकरी असून जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसायही करतात. त्यामुळेच स्वतः जवळ असलेल्या पशुधनाला ते पोटच्या गोळ्या प्रमाणे वागवतात. त्यांची नित्यनेमाने सेवा करतात.

           आज माणुसकी हरवत चालली आहे. प्राणी मात्रावंर प्रेम करून त्यांच्यावर भूतदया दाखवून ते जिवंत ठेवण्याचं काम भोंडे कुटुंबानी दाखवून दिले आहे. आपल्या गंगा या लाडक्या गायीच्या पहिल्या बाळंतपणाच्या डोहाळे कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 16 फेब्रुवारी 2024 ला चिचोर्डी येथील जगन्नाथ महाराज देवस्थान येथे केले. गौमतेविषयी अशे प्रेम पाहून लोक भारावून गेले. गौमातेची मनुष्य जातीवर उपकाराची जाणीव ठेवत, गौमातेच्या प्रति श्रद्धा तिच्या विषयी प्रेम असल्याचे सांगत मोठ्या आवडीने श्री प्रशांत भोंडे यांनी डोहाळे जेवणाचे आयोजन करीत किमान 500 लोकांना आमंत्रित केले होते.

    यावेळी भद्रावती येथील राधाकृष्ण गोरक्षण समितीचे सचिव डॉ. चेतन शेंडे यांची विषेश उपस्थिती होती. मुक्या जनावरांची संवेदना लक्षात घेऊन प्रशांत व समिक्षा भोंडे या शेतकरी कुटुंबाने गंगा गायींचा डोहाळे कार्यक्रम उत्साहात साजरा केला. यानिमित्ताने प्राणी मात्रावंर अभूतपूर्व संदेश देण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये