ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळवून देण्यासाठी लोकसभा निवडणूक लढणार – रविकांत तुपकर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

शेतकरी, शेतमजूर, कामगार,कर्मचारी यांच्यावर सत्तारूढ सरकार कडून सातत्याने अन्याय केला जात आहेत, तेव्हा या ज्वलंत समस्या दूर करण्यासाठी जनसामान्यांच्या आग्रही भूमिका मुळे आपण लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी देऊळगाव राजा येथे विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले,

रविकांत तुपकर यांनी सांगितले की, गेल्या 22 वर्षांपासून आपण शेतकरी हितासाठी चळवळी च्या माध्यमातून लढत आहे, शेतमालाला हमीभाव मिळावा,गारपिटीने ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी,पीक विमा तात्काळ मिळावा,यासाठी शेतकरी आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले आहेत, आपणास बदनाम करण्यासाठी शासनाकडून पोलीस प्रशासन च्या मदतीने खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले, मात्र आपण आता शेतकऱ्यांच्या हितासाठी लोकसभा निवडणूक लढणार असून जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी, नागरिक प्रस्थापित राजकारण्यांना कंटाळून सत्ता परिवर्तन घडवून आणणार असून आपणास संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे, धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी ही निवडणूक होणार असून आपणास मतदार निवडून देईल असा आत्मविश्वास व्यक्त केला. आपण कोणत्याही पक्षात जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले, पत्रकार परिषदेत बबनराव, चेके,मधुकर शिंगणे, शेख जुलफेकार,वसंतराव,पाटील, गणेश शिंगणे,सरपंच भगवान पालवे,मोहसीन शेख,संतोष शिंगणे,कुणाल शिंगणे, बबन चेके,नसीम भाई,प्रदीप हिवाळे,आदी,उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये