ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

29 वी राज्यस्तरीय अक्रोबॅटीकस जिम्नॅस्टिकस स्पर्धा

चंद्रपुर जिल्हा संघाला वूमन्स ट्रायो क्रीडा प्रकारात 09 मेडल प्राप्त

चांदा ब्लास्ट

क्रीडा क्षेत्रातील जगप्रसिद्ध श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन द्वारा मान्यताप्राप्त महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नॅस्टिकस असोसिएशन व अमरावती जिल्हा हौशी जिम्नॅस्टिकस असोसिएशन द्वारा नुकत्याच जिम्नॅस्टिकस हॉल, HVPM, अमरावती येथे पार पडलेल्या 29 व्या राज्यस्तरीय अक्रोबॅटीकस जिम्नॅस्टिकस स्पर्धा मध्ये चंद्रपुर जिल्हा संघाला वूमन्स ट्रायो क्रीडा प्रकारात 09 मेडल प्राप्त झाली आहेत.

चंद्रपुर जिल्ह्यातील जिम्नॅस्टिकस खेळाडू ना पहिल्यांदाच हे ऐतिहासिक यश प्राप्त झालेले आहे, त्यात चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमॅच्युअर जिम्नॅस्टिकस असोसिएशनच्या कु. पलक शर्मा ( BSC सेकंड इयर – सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपुर), कु आचल हिवरकर ( MSC सेकंड इयर – आंबेडकर महाविद्यालय,चंद्रपुर) व कु कृतिका बंडू भोस्कर (BSC फायनल इअर – नीलकंठराव शिंदे विज्ञान महाविद्यालय, भद्रावती) या तिघींनी सुद्धा ग्रुप इव्हेंट मध्ये प्रत्येकी 03 ब्रॉंझ मेडल असे एकुण 09 ब्रॉंझ मेडल प्राप्त केलेले आहेत.

सर्व विजेत्या खेळाडू यांनी आपल्या यशाचे सर्व श्रेय आपले संघाचे मुख्य कोच व चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमॅच्युअर जिम्नॅस्टिकस असोसिएशनचे संस्थापक व सचिव श्री दुर्गराज एन रामटेके व आपल्या आईवडील यांना दिलेले आहे.

या स्पर्धा मध्ये भद्रनाग स्पोर्ट्स अकादमी चे कु तंनू आडे, कु साक्षी वासेकर, क्रिश भोस्कर, आयुध स्पोर्ट्स अकादमी चा दीक्षांत रामटेके, कोरपना तालुका स्पोर्ट्स अकादमीचा पृथ्वी पंधरे या खेळाळू नि सहभाग घेतला होता.

या स्पर्धा पुर्वतयारी करीता इंटरनॅशनल अक्रोबॅटीकस जिम्नॅस्टिकस एक्स्पर्ट व राज्य कोषाध्यक्ष श्री आशिष सावंत ( मुंबई), कु सोनाली बोराडे, (चेंबूर), प्रा डॉ संजय हिरोडे( HVPM, अमरावती),श्री मुकेश घ्यार ( नागपुर) व कु प्राची पारखी ( नागपुर)यांचे मार्गदर्शन लाभले.

जिम्नॅस्टिकस या ऑलिम्पिक क्रीडाप्रकारातील यांच्या या ऐतिहासिक यशा करीता *महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नॅस्टिकस असोसिएशनचे अध्यक्ष श्री संजय शेट्टे* ( उपाध्यक्ष – महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, मुंबई), राज्य उपाध्यक्ष श्री महेंद्र चेंबूरकर( मुंबई),राज्य जनरल सेक्रेटरी डॉ मकरंद जोशी ( छत्रपती संभाजी नगर),हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ च्या सेक्रेटरी डॉ सौ माधुरी चेंडके ,चंद्रपुर जिल्हा क्रीडा अधिकारी श्री अविनाश पुंड, श्री मनोज पंधराम, श्री विनोद ठिकरे, सौ जयश्री देवकर, श्री विजय ढोबळे, श्री संदीप उईके, जिल्हा जिम्नॅस्टिकस असोसिएशनचे सदस्य पदाधिकारी व शुभेचुक आशुतोष गयनेवर, निलेश गुंडावार, ऍड राजरत्न पथाडे, डॉ विशाल शिंदे, डॉ विजय सोमकुवर,डॉ अंकुश आगलावे,बंडू करमनकर, सॅम मानकर,मनीष भागवत,अतुल कोल्हे, सुनिल गायकवाड,किशोर कहारे, सौ वनश्री मेश्राम, संजय माटे, सौ शीतल रामटेके, गौतम भगत,सिनु रामटेके,करण डोंगरे,संदीप पंधरे,अजय पाटील,विकास देशभ्रतार,कुंदन पेंदोर, इत्यादी व जिल्ह्यातील सर्व क्रीडा प्रेमी द्वारा विजेत्या खेळाडू चे अभिनंदन केलेले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये