ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जबाबदाऱ्या आणि स्वावलंबन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त – नाजुका आलाम

मूल तालुक्यातील चितेगाव, बोरचांदणी, जुनसुर्ला, नवेगाव, बेंबाळ, गोवर्धन येथील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये बुक वाटप

चांदा ब्लास्ट

विद्यार्थ्यांच्या बुध्दितमत्तेला योग्य दिशा द्यायची असेल तर त्याची सुरवात त्यांच्या लहानपणापासूनच करायला हवी. विद्यार्थ्यांवर पडलेल्या अशा छोट्या-छोट्या आर्थिक जबाबदाऱ्या आणि स्वावलंबन त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरतात अश्या सामाजिक कायकर्त्या नाजुका हनुमान आलाम यांनी म्हणाल्या.

महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तथा चंद्रपूरचे माजी सभापती काँग्रेस नेते दिनेशभाऊ चोखारे यांच्या मार्गदर्शनात सामाजिक कायकर्त्या नाजुका आलाम, काँगेसचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते करण कुंभरे, यांचे उपस्थित मूल तालुक्यातील चितेगाव, बोरचांदणी, जुनसुर्ला, नवेगाव, बेंबाळ, गोवर्धन येथील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये बुक वाटप करण्यात आले.

यावेळी चितेगाव येथे शाळा समितीचे अध्यक्ष गुणजी वाकुडकर, सदस्य अरुण मेश्राम, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक धर्मरन्त वाकडे, शिक्षक गोविंदा सोनटक्के, संजय गुरुनुले, शिक्षिका कल्पना वाकडे, वर्षा नरुले, बोरचांदणी येथे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापिका आशा जोगी, समितीचा अध्यक्ष संदीप कळसार, जिल्हेवार, माधुरी पोरेड्डीवार मॅडम , पेंदोर मॅडम, जुनसुर्ला येथे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बलराम वाळके, गावचे उपसरपंच राजेश गोवर्धन, समितीचे अध्यक्ष मनोज बेले, उपाध्यक्ष वर्ष मडावी, शिक्षक प्रेमदास सुरपाम, गणेश कुलसंगे, प्रतिभा नगराळे मॅडम, चित्रगत पुसतोडे, रेखा वारपल्लीवार, मंजुषा पारखी मॅडम, वृंदा पगडपल्लीवार, बेंबाळ येथे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद धामणे, शीक्षक राजेश सांगडे, विद्या निलगिलवार मॅडम , कल्पना मेश्रामी मॅडम, कालिदास कोसरे, गावातील प्रतिष्ठित अजय बासरकर, नवेगाव येथे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बंडू गेडाम, समितीचे सदस्य साईनाथ बुडे, शिक्षक कैलास वडक,. विजय बावणे, किरण मानकर, जगदीप दुधे, बालस्वामिओ कुमरे, उमाकांत दोडके, आकाश कुकुलकर, गोवर्धन येथे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बबन कन्नाके, समितीचे वर्षा कलाने यांचेसह तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.

पुढे बोलतांना त्या म्हणाल्या कि, दिनेश चोखारे याचे हे कार्य अभिमानास्पद असून आज आपल्याला सामाजिक कार्यासह सर्व क्षेत्रात प्रगती करावीच लागेल. जोपर्यंत आपण ध्येय ठेऊन काम करत नाही, तोपर्यंत आपण काय करतो याला महत्त्व नाही. म्हणून समाजात वावरताना कोणता तरी उद्देश समोर ठेऊनच ध्येय प्राप्त करावे लागेलच. विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात भेदभाव न करता प्रगती केली पाहिजे. मुलांच्या बुध्दितमत्तेला योग्य दिशा द्यायची असेल तर त्याची सुरवात त्यांच्या लहानपणापासूनच करायला हवी. आपण त्यांच्यावर योग्य वयात संस्कार दिले तर त्यांना गोष्टींची जाणीव होईल. मुलांना योग्य वयात बचत आणि बचतीशी संबंधित गोष्टी शिकवा. बचत आणि खर्च यातला फरक त्यांना समजावून सांगा. देशातील वेगवेगळ्या बँकांनी लहान मुलांसाठी बँकेचे खाते उघडण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. ही एक नवी वाटचाल आपल्या मुलांना अगदी लहान वयापासूनच जागरूक करेल.

बचत कशी करायची त्याचे फायदे काय हेही त्यांना सांगा असे सामाजिक कायकर्त्या नाजुका हनुमान आलाम यांनी सांगितले.

वरील सर्व शाळांमध्ये सामाजिक कार्यकर्ता नाजूका आलाम, काँगेसचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते करण कुंभरे, यांनी शाळांना पुस्तके आणि शालेय साहित्याचे वाटप केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये