ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखेर खासदार महात्मे यांच्या मध्यस्थीने बुलडाणा येथील लवंगे यांचे उपोषण सुटले 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

  आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र धग धगत्या निखाऱ्या वरून जात असताना मुख्यमंत्री शिंदे हे जरांगे यांच्या उपोषणाचे चोचले पुरवीत असतांना धनगर समाजाचे लवंगे हे गेली सोळा दिवसापासून बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेले असतांना प्रशासनाकडून लक्ष वेधले असता शासन मात्र दुर्लक्ष करत होते.

  मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींना कडेलोट करण्याचे मनसुबे सध्याच्या शिंदे सरकारचा मानस असून मुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची घेतलेली मनोज जरांगे यांच्या अटी शर्थी ला अधीन राहून शपथ त्याची पूर्तता म्हणून विजयी सभा आणि गुलालाची उधळण अख्या महाराष्टाने डोळ्यात चित्र साठवलेले असे असतांना परत त्रोटक अटी घेऊन उपोषणास अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे हे पुन्हा उपोषणास बसले आता तर नाकातून रक्त वाहू लागले रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब चुकता करावा लागेल असा शिंदे सरकारला इशारा दिला

आणि त्या इशाऱ्यावर सत्तेत असणारे नाचत आहे

तर दुसरीकडे धनगर समाजाला अनुसूचित जमाती मधे समाविष्ट करण्यासाठी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर नंदू लवंगे हे गेली सोळा दिवसापासून आमरण उपोषणास बसलेले असतांना जिल्हा प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतलेली असतांना शिंदे सरकारकडून याची कोणतीही दखल घेतल्या गेली नसल्याने धनगर समाजाचे खासदार महात्मे यांच्या मध्यस्थीने उपोषण सोडण्यात आले. येत्या प्रत्येक निवडणुकीत एकच पर्व राहणार असल्याचे संकेत मिळत आहे .

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये