ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवरात्री दांडीया – गरबा उत्सव मध्ये A-B गरबा ग्रुप भद्रावती चमकला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती येथे नवरात्रि निमित्त दांडीया उत्सव – 2023 धुमधडाक्यात संपन्न झाला. कधि नव्हे ते या वर्षी शहरात अनेक ठिकानी दांडीया उत्सव निमित्त दांडीया – गरबा स्पर्धेचे आयोजन करन्यात आले होते. स्पर्धेला अनेक दांडीया-गरबा ग्रुप्सने भरभरुन प्रतिसाद दिला. या स्पर्धेच्या जय्यत तयारीसाठी भद्रावतीतील बहुतेक दांडीया ग्रुप ने जवळपास एक महिना पुर्विपासुनच सराव करुन परिश्रम घेतले होते.

शहरात अनेक ठिकानी दांडीया स्पर्धा आयोजित होत्या. त्यापैकी प्रमुख म्हणजे भद्रावती गरबा-दांडीया उत्सव समिति तर्फे नगर पालिका परिसर, रेलवे दुर्गा मंडळ भांदक तर्फे रेलवे स्टेशन जवळ, सार्वजनिक माता वैष्णोदेवी मंदिर मोहबाळा तर्फे मोहबाळा येथे तथा आयुध निर्माणी कर्मचारी परिवारांसाठी आयुध निर्माणी वसाहतीत गरबा-दांडीया स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

या स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन ग्रुपला व वैयक्तिक स्पर्धकाला आकर्षक बक्षीसे व रोख रकमेच्या स्वरुपात बक्षीसे ठेवन्यात आली होती.

विषेश म्हणजे या वर्षी दांडीया उत्सव मध्ये A-B गरबा ग्रुप भद्रावतीचे वर्चस्व राहीले असुन या ग्रुप ने तिन ठिकानी स्पर्धेत यश संपादन केले. अलग अलग-अलग ठिकानी प्रथम, द्वितीय व द्वितीय स्थान पटकावून ग्रुप ने प्रेक्षकांची मने जिंकली.

या ग्रुप मध्ये-अश्विन राहुल खोब्रागडे,पलक प्रफुल बगडे,कनन प्रफुल बगडे, भूमिका राजेश दुपारे, कृष्णा राजेन्द्र लाबोडे,सांन्किसा सुनील हिवाळे, जान्हवी गजेन्द्र ठेंगे, पलक सिध्दार्थ नागरे,रितु अनिल सपकाळ, तेजस्वी वानखेडे, प्रतिक्षा साव, तुषार रामटेके, तरुण रवि लांजेवार,शिफा मंगेश पवार व कृष्णा शिवरकर यांचा सहभाग होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये