ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार अध्यक्ष म्हणून उपस्थित होते

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

         भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीद्वारा संचालित विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे वर्ग ११ वीच्या विद्यार्थ्यांकडून वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

        कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम,राजू केदार,शेखर प्यारमवार,भुजंग आभारे,धनंजय गुरूनुले यांनी विद्यार्थ्यांना उचित मार्गदर्शन केले. तसेच वर्ग ११वीआणि १२ च्या विद्यार्थ्यांनी सुद्धा भाऊक होऊन मनोगत व्यक्त केले.

       कार्यक्रमाचे संचालन प्रवीणा आडेपवार आणि आसावरी रामगिरवार तर आभार सानिका दहेलकर हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रसन्ना अल्लुरवार,अशोक लांजेवार,शरद पोहनकर, प्रकाश गेडाम,राजश्री बिडवई, राहुल आदे,वासंती नागोसे,नम्रता गुज्जनवार,शेंडे तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये