ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षक आणि ग्रामस्थांनी जि.प. लालगुडा शाळेचा केला कायापालट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना: शाळा म्हणजे विद्या देणारे केंद्र होय.सुंदर, स्वच्छ आणि मोकळं वातावरण असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो.पंचायत समिती कोरपना अंतर्गत येणारी आदिवासी बहुल लालगुडा गावातील जिल्हा परिषद शाळा याचे मूर्तीमंत उदाहरण ठरत आहे.

        या शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक प्रकाश बोबडे यांनी शाळेतील उपक्रमशील शिक्षक गोविंद पेदेवाड यांच्या मदतीने स्वयं इच्छाशक्तीच्या बळावर या शाळेचे रूप व शिक्षण पद्धती बदलवण्याची किमया अल्पावधीतच करून दाखवली. या शाळेच्या दोन्ही शिक्षकांनी स्वतःच्या पगारातून प्रत्येकी अकरा हजार रुपयांचा निधी जमा केला. त्याशिवाय ग्रामस्थांच्या सहभागातूनही पंचावन्न हजार रुपयांची लोकवर्गणी शाळेच्या रंगरंगोटीसाठी जमा करण्यात आली. शिक्षक आणि लोकांनी एकत्र येत निधी काढून शाळेचा कायापालट केला. शाळेचा परिसर, भिंती बोलक्या झाल्याने शाळा व परिसर विद्यार्थ्यांना आकर्षित करीत आहे.

          शाळेतील भौतिक सोयी सुविधा , गुणवत्ता पूर्ण शिक्षण व अध्यापना चा ज्ञानरचनावादी दृष्टिकोन तसेच शाळेतील बोलक्या भिंती, विद्यार्थ्यांची उपस्थिती यामुळे शाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होत आहे. खासगी शाळेच्या तुलनेमध्ये या शाळेमधील शिक्षणाचा दर्जा वरचा असून सर्वांनाच त्याविषयी विश्वास वाटत असल्याचे पालकांमधून सांगण्यात येत आहे.

       या शाळेचा शैक्षणिक दर्जा आणि शिक्षकांच्या कार्य कौशल्या कडे पाहून या शाळेला आय एस ओ दर्जाचे मानांकन मिळावे. कारण ग्रामीण भागातील शिक्षणाच्या दर्जा विषयी चर्चा होत असताना कोरपना तालुक्यातील लालगुडा शाळेने एक आदर्श निर्माण केला आहे. या शाळेची बोलकी इमारत आणि शिक्षणाचा दर्जा यामुळे ही शाळा परिसरामध्ये चर्चेत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये