ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करा

कचराळा ग्रामपंचायतचे तहसीलदारांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            दोन दिवसांपूर्वी भद्रावती तालुक्यात गारपिटासह वादळी पाऊस झाला. या वादळामुळे तालुक्यातील अन्य गावांसह कचराळा गावातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे 90 टक्के नुकसान झाले. त्यामुळे कचरा गावातील शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कचराळा ग्रामपंचायतीतर्फे तहसीलदार यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

खरिपाचा हंगामा आधीच समाधानकारक गेला नसल्याने येथील शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. सध्या शेतात रब्बी पीक उभे आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी तालुक्यात गारपिटासह भयानक वादळी पाऊस झाला. या गारपिटात शेतातील गहू, हरभरा, मिरची, ज्वारी, मुग तथा भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या गारपिटीमुळे गावातील 90% रब्बी पीक उध्वस्त झाल्याने येथील शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले.

त्यामुळे या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष देऊन गावातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कचराळा ग्रामपंचायत कार्यालयातर्फे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना सरपंच सीमा कुळमेथे, नितेश येरगुडे, संदीप निखाडे, कपिल झाडे. शुभम झाडे, पंकज उरकुडे, भैय्याजी बोबडे, प्रकाश सोमलकर, भाऊराव मोहितकर, छत्रपती एकरे तथा गावकरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये