Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदेवाही भातगिरणी संस्थेवर शेतकरी सहकार विकास पॅनलचा दणदणीत विजय

नवनियुक्त संचालकांचा विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांकडून सत्कार

चांदा ब्लास्ट

काल पार पडलेल्या सिंदेवाही येथील भात गिरणी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित शेतकरी सहकार विकास पॅनलने भाजपा प्रणित पॅनलचा ८-३ अशा मोठ्या फरकाने पराभव करीत दणदणीत विजय नोंदविला. या निवडणुकीचे विशेष म्हणजे काँग्रेस प्रणित पॅनलचे सुनील उट्टलवार यांनी भाजप प्रणित पॅनलचे दामोदर नन्नावार १४७ अशा सर्वाधिक मताधिक्याने पराभव केला. तर राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आज दौऱ्या दरम्यान नवनियुक्त संचालकांचा सत्कार केला.
 सिंदेवाही भातगिरणी सहकारी संस्था रजि. नं. 1094 ची निवडणूक काल पार पडली.अतिशय प्रतिष्ठेची व चुरशीची समजल्या जाणाऱ्या सदर निवडणुकीत काँग्रेस प्रणित शेतकरी सहकार विकास पॅनलने मागील विजयी परंपरा कायम राखत यंदाचे निवडणुकीतही मुसंडी मारत ८ विरुद्ध ३ अशा मोठ्या फरकाने विरोधकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. या विजयाच्या संघर्षात काँग्रेसचे ज्येष्ठ रघुनाथजी शेंडे, चंद्रशेखर चन्ने, बाबुराव गेडाम मधुकर पा. बोरकर, कृउबा समिती सभापती रमाकांत लोधे,उपसभापती दादाजी चौके,सुनील उट्टलवार यांनी विशेष रणनीती आखून संपूर्ण मतदारांना विश्वासात घेत महत्वपूर्ण भूमिका वठविली.
आज राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सिंदेवाही दौऱ्यावर असताना भात गिरणी सहकारी संस्था सिंदेवाही येथे भेट देऊन उपस्थित नवनियुक्त संचालक  काँग्रेस शहराध्यक्ष तथा संचालक सुनील उट्टलवार, यादव बोरकर,विकास आदे,विलास रामटेके, सिंधूताई लोखंडे, छब्बूताई नागोसे, विनायक कावळे, सहदेव खोब्रागडे यांचा सत्कार करण्यात केला. याप्रसंगी भात गिरणी सहकारी संस्थेवर काँग्रेस प्रणित पॅनल ने जो विजय नोंदविला आहे यामागे काँग्रेसचे सहकार विभाग, तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते,  सिंदेवाही लोनवाहीचे सर्व पदाधिकारी व नगरसेवक, नगरसेविका यांच्या मेहनतीचे फलित असल्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले.
आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष रमाकांत लोधे, महिला अध्यक्षा सीमा सहारे, नगराध्यक्ष स्वप्निल कावळे,उपनगराध्यक्ष मयूर सूचक, तालुका उपाध्यक्ष संजय गहाने, कृउबा संचालक जयश्री कावळे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष राहुल बोडणे, राहुल पोरेड्डीवार, सचिन नाडमवार,युवक अध्यक्ष अभिजीत मुप्पिडवार, महेश मंडलवार, नगरपंचायतीचे पदाधिकारी ,नगरसेवक नगरसेविका,काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रमुख्याने उपस्थित होते
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये