ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
तिरळे कुणबी समाजातर्फे भव्य राज्यस्तरीय उपवर-उपवधू परिचय मेळाव्याचे आयोजन

चांदा ब्लास्ट
तिरळे कुणबी समाज संत बाजीराव महाराज बहुउद्देशिय संस्था, मुकूटबन ता. झरी जामणी जि. यवतमाळ यांच्या वतीने रविवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी हिमांशु सेलिब्रेशन, मुकूटबन, ता. झरी जामणी जि. यवतमाळ येथे सकाळी १०.०० वाजता तिरळे कुणबी उपवर-उपवधु परिचय मेळावा आयोजित केला आहे.
तरी राज्यातील तिरळे कुणबी समाज बांधवांनी व उपवर-उपवधू यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा तिरळे कुणबी समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र खांडेकर यांनी केले आहे. सघंटनेचे सचिव गजानन चौधरी, उपाध्यक्ष मोहन चौधरी, सतीश विटेकर, किशोर धोटे, रमेश धोटे, कवडूजी वैद्य यांनी एका पत्रकाव्दारे कळविले.