ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती शहरासह तालुक्यात गारपीट व वादळाचे थैमान

रब्बी पिकांचे नुकसान ; पंचनामा करण्याची सभापती भास्कर ताजणे यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

भद्रावती शहर तथा तालुक्यातील गावांना दिनांक दहा रोज शनिवारला रात्रोच्या दरम्यान गारपिटासह भयंकर वादळाने झोडपले. या गारपीट तथा वादळामुळे तालुक्यातील ९० टक्के गावातील रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तहसीलदारांनी तलाठ्यांना शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश द्यावे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजने यांनी केली आहे.
शनिवारला रात्र अचानक गारपीट तथा प्रचंड वादळाला सुरुवात झाली. या घटनेत तालुक्यातील मांगलीष तिरवंजा, चंदनखेडा, पिरली, सागरा, तथा तालुक्यातील ९० टक्के गावातील हरभरा, तूर, गहू व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. या वादळात रब्बी पीक जवळपास पूर्णपणे उध्वस्त झाले, तर या वादळामुळे अनेक  झाडांच्या फांद्या व झाडे कोसळली. सदर घटना रात्रीच्या वेळेस घडल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
वादळामुळे शहरातील तथा तालुक्यातील अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. या घटनेची गंभीरतेने दखल घेऊन तहसीलदारांनी तलाठ्यांना शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी सभापती भास्कर चाचणी यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये