ब्रम्हपुरीत शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा होणार
ग्रंथदिंडी, शिवपालखी आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
शिव छत्रपती फाउंडेशन ब्रम्हपुरीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार असून, ग्रंथदिंडी, शिवपालखी मिरवणूक आणि “शिवराय ते भीमराय” या विशेष प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे._
_सायंकाळी ४:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून ग्रंथदिंडी आणि शिवपालखी मिरवणुकीला प्रारंभ होईल. परंपरागत वेशभूषा, भगवे ध्वज आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक नगर परिषद, ब्रम्हपुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज अक्षरूत पुतळ्यापर्यंत उत्साहात मार्गक्रमण करणार आहे._
सायंकाळी ७:०० वाजता झांशी राणी चौक, ब्रम्हपुरी येथे सुप्रसिद्ध गायक आणि राष्ट्रीय प्रवक्ते राहुलदादा अनिकर यांच्या “शिवराय ते भीमराय” या विशेष गीत-संदेशात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित या कार्यक्रमातून समाजप्रबोधन घडवले जाणार आहे._
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी विरोधी पक्षनेते व आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. नामदेवजी किरसान उपस्थित राहतील, तर अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. देवेशजी कांबळे असतील. याशिवाय दामोदरजी मिसार, विलास विखार, डॉ. राजकुमार शेंडे, खेमराज तिवाडे, प्रा. संजय मगर, प्रा. डॉ. राकेश तलमले, इंजि. लीलाधर बांगरे, प्रशांत पिलारे, हेमंत नाकतोडे, आकाश खंडाळकर आणि विलास दुपारे हे मान्यवर देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत._
शिवजयंती हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि ऐतिहासिक वारशाचा अभिमान असलेला सोहळा आहे. या भव्य कार्यक्रमास शहरातील नागरिक, इतिहासप्रेमी, तरुण आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिव छत्रपती फाउंडेशन ब्रम्हपुरीचे अध्यक्ष जगदिश (मोंटू) पिलारे तसेच आयोजक मंडळाने केले आहे._