रेती माफीयावर धडाकेबाज कार्यवाही
एकूण 55 लाख 70 हजारावर मुद्येमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
नमुद घटना ता. वेळी व ठिकाणी दिनांक 01.06.2025 रोजी मुखबीर द्वारे गोपनिय माहीती प्राप्त झाली की, धोत्रा मार्गाने वर्धा कडे ट्रक मध्ये रेती ची चोरटी वाहतुक केली जाणार आहे. त्या अनुषंगाने त्यांनी प्रत्यक्ष हाजर राहुन सपोनि प्रफुल डाहुले, पोउपनि अशिवनकुमार खेडीकर, पोलीस स्टेशन अल्लीपुर व पोलीस उपनिरीक्षक, सुधिर बनकर, पोलीस शिपाई रामदास दराडे, ब.नं. 1464, पोलीस शिपाई संदीप बोरबन, ब.नं. 635, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उपविभाग पुलगांव यांचेसह तळेगाव (टालाटुले) येथे नाकाबंदी करून रेती ने भरलेले तिन टिप्पर पकडुन एकुण 55,70,000/- रू चा मुद्येमाल जप्त करून नमुद 1. संतोश भिक्कु आहके, रा. तळेगांव (टालाटुले) ता.जि. वर्धा 2. प्रषांत कामडी, रा. तळेगांव (टालाटुले) ता.जि. वर्धा (पसार) 3. विषाल लक्ष्मणराव ससाणे, रा. सावंगी मेघे, वर्धा ता.जि. वर्धा (पसार) 4. प्रणित सुधाकर देवडे, रा. बोथुडा ता. समुद्रपुर जि.वर्धा 5. विलास मारोतराव मन्ने, रा. हिरापुर सालोड ता. जि. वर्धा 6. गोलु जगताप, रा. वर्धा ता. जि. वर्धा आरोपी विरूध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.
सविस्तर असे की, घटना ता. वेळी व ठिकाणी दिनांक 01.06.2025 रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभाग पुलगांव श्री. राहुल चव्हाण, यांना मुखबीर द्वारे गोपनिय माहीती प्राप्त झाल्यावरून पोलीस स्टेषन सोनेगांव स्टेषन फाटा जवळ 15.30 वा. नाकाबंदी लावली असता धोत्रा कडुन एका मागे एक ट्रक येतांना दिसले सदरचे ट्रक थाबंवुन विचरपुस केली असता त्यांना वाहना मध्ये रेती असल्याचे सांगीतले ट्रकची पाहणी केली असता तिन्ही ट्रक मध्ये गौण खनिज काळी रेती असल्याचे दिसुन आल्याने त्यांना रॉयलीटी बाबत विचारणा केली असता रॉयलीटी नसल्याचे सांगीतले. वाहान चालक व मालका विरूध्द गुन्हा नोंद करून रेती व तिन ट्रकसह एकुण 55,70,000/- रू. चा माल जप्त केला आहे.