ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तहसिलदार म्हणतात “यहा सब शांती शांती है?”

राज्य पत्रकार संघातर्फे तहसिलदारांचे स्वागत करून साधली हितगुज - प्रा.महेश पानसे

चांदा ब्लास्ट

मूलचे तहसिलदार रविन्द्र होळी यांची बदली होऊन ते गोंदिया जिल्हयातील आमगाव तालुक्यात गेलेत. मृदुला गोरे नवीन तहसीलदार म्हणून मूलच्या तहसिलदार व तालुका दंडाधिकारी  म्हणून रूजू झाल्यात.राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी त्यांचे परंपरेनुसार स्वागत करुन भावी कार्यासाठी शुभेच्या दिल्यात,थोडक्यात हितगुज साधले.

पुणे, नागपूर जिल्हाधिकारी  कार्यालयात काम केल्याने मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहेच.४ दिवसात मूल  तालुक्याची ओळख होणे तसेही गमतीचा भाग नसला तरी मूल चांगला वाटला असा शेरा मैडम नी मारला. बरे वाटले,पण त्याच वेळी  पुढयात असलेले निवडणुकांचे वादळ व  भविष्यातील  उठाठेवी कदाचीत मूल तालुक्याबद्धल चे त्यांचे मत बदलविण्यास कारणीभूत ठरणार तर नाहीत ना ही बुद्धिजीवी असणाऱ्याची चिंता प्रामाणिकपणाची असणार आहे.

         मूल शहराने किंबहुना चंदपूर  जिल्हयाने आजमितीस अनेक प्रशासकीय अधिकारी बघितले आहे. पालकमंत्री यांचे क्षेत्र असलेल्या मूल तालुक्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कामे करायला खूप वाव आहे. हे जरी खरे असले तरी कार्यकर्त्यांची दबावफळीही तेवढीच भारी असते  व हिच कसरत कार्यशिल अधिकारी यांना भरकटायला लावते. हा जुना अनुभव जनतेच्या पाठिशी आहे.

चंदपूर जिल्यातील सर्वात मोठे रेतीघाट मूल तालुक्यात आहेत. संपूर्ण विदर्भात इथून रेतीची तस्करी चालते व ही बाब आता नवीन राहिली नाही. महसूल अधिकारी म्हणून तहसिलदार  राष्ट्रीय संपत्तीचे किती जतन करतात यावर सालभर गरमागरम चर्चा जिल्ह्यात सुरु असतात, उत्तम प्रशासक असलेले तहसीलदार होळी सुद्धा यामुळे रडारवर आले होते. तालुक्यातील ९ रेतीघाट करोडो ची उलाढाल करणारे आहेत. सारे रेतीतस्कर दबंग आहेत. महसूल विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी या तस्करांचे दावणीला बांधले आहेत ही चर्चा आहेच.

अशा स्थितीत तालुका महसूल प्रमुख म्हणून नवीन तहसीदार मॅडम यांना धोरण ठरवावे लागणार आहे. मूल शहरात ठेकेदाराची संख्या व लाबी भारी आहे.राजकिय चळवळीत असलेला अंदाजे कुठल्या न कुठल्या ठेकेदारीत गुंतला आहेच.अवैध  उत्खनन हा मूल तालुक्यात गोरखधंदा झालेला आहे. भिशी,मुरूम यांचा सऱ्हास उपसा राबविण्याचे पुण्य सांभाळला आले तर ही बाब नविन तहसीलदार यांना गौरवांकित  करणारी ठरेल.

तहसिलदार  मैडम यांना येऊन ४ दिवस लोटले. “यहा सब शांती शांती है” हे जरी दिसत असले तरी ही मात्र, वादळापूर्वीची शांतता असेल असे जाणकारांना वाटते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये