ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जुगार कायद्यान्वये रेड

आरोपीचे ताब्यातून 76 हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

       सविस्तर याप्रमाणे आहे कि, आज रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा द्वारे उपविभाग आर्वी हद्दीत पो स्टे कारंजा येथे अवैध धंद्यावर कारवाई ची मोहीम राबवित असताना यातील नमूद आरोपी हे सार्वजनिक ठिकाणी गोडीबार चौक कारंजा मध्ये सट्टा पट्टीचा जुगार खेळताना रंघेहात मिळून आल्याने पंचसमक्ष आरोपीचे ताब्यातुन 1) सट्टापट्टी चे आकडे लिहलेले दोन कागद 00/- रू. 2) नगदी 23,570/- रु.3) दोन डॉट पेन कि 10 /- -रु  4) एक सॅमसंग कंम्पनीचा अँडराँईड मोबाईल की. 3,000 /- रू. 5)एक जुनी वापरती होंडा ट्रिगर मो. सा. क्र. MH-32-AA-2411 की. 50,000/-रू असा जु. की. 76,580 /- रू चा. मुद्देमाल मिळून आल्याने तो मोक्यावर जप्त केला.

वरून पो.स्टे.कारंजा येथे 1)मोतीसीग जयसिंग महल्ले वय 48 वर्ष रा. कारंजा 2)अमोल गोपालसींग गिल वय वय 40 वर्ष रा. सावद ता. ता. आर्वी जि. वर्धा 3)दामोदर शिवराम बन्सोड वय 65वर्ष रा. काकडा ता.कारंजा जि. वर्धा आरोपीविरुध्द कलम 12(अ) म.जु.का. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री नूरूल हसन यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड यांचे निर्देशाप्रमाणे सफ़ौ/संतोष दरगुडे, पोहवा/भूषण निघोट, नापोशी/विकास अवचट, राकेश आष्टणकर, हर्षल सोनटक्के यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये