ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन हिंगणघाट शहरातील कुख्यात दारु विक्रेत्याविरुध्द एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन वर्धा शहर हद्दीतील कुख्यात दारु विक्रेता गणेश अरुण भांगे, वय ३४ वर्ष, रा. डांगरी वार्ड, हिंगणघाट जि. वर्धा याचेविरुध्द भारतीय दंड विधान, महाराष्ट्र दारुबंदी कायदा या सारख्या कायदयान्वये सन २०१९ ते २०२४ पावेतो एकुण २० गुन्हयांची नोद आहे. तत्पूवी सुध्दा स्थानबध्द गणेश भांग याचेविरुध्य एकुण १६ गुन्हे पोलीस स्टेशन वर्धा शहर अभिलेखावर नोंद आहेत, ज्यामध्ये खुनाचा प्रयत्न, मारहाण करुन जखमी करणे, महाराष्ट्र दारुबंदी कायदान्यये गावठी मोहा दारु, देशी विदेशी दारु बाळगुन त्याचे चोरटया मार्गाने दारुची तस्करी करणे यासारखे गंभीर गुन्हे करण्याचे सवयीचा गुन्हेगार आहे.

स्थानबध्द गणेश भांगे याने पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीतील डांगरी वार्ड, आठवडी बाजार परिसरात स्वतःच्या टोळी च्या मदतीने अवैधरीत्या दारु चा पुरवठा करीत होता, त्याचे अवैध दारु विक्रीच्या गुन्हेगारी कृत्यांवर आळा बसावा तसेच परिसरातील सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहावी याकरीता त्याचेविरुध्द तत्कालीन पोलीस निरीक्षक, मारुती मुळुक, पोलीस स्टेशन हिंगणघाट यांनी हातभट्टीवाला इसम म्हणून महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हावभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याचाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानवध्द करण्याचावतचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, वर्धा यांना सादर करण्यात आला होता. सदरहु प्रस्तावाची मा. जिल्हा दंडाधिकारी यांनी गांभीवाने दखल घेवून गणेश अरुनण भांगे, रा. हिंगणघाट जि. वर्धा याचा दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ रोजी स्थानबध्द आदेश जारी करण्यात आला.

त्याअनुषंगाने गणेश अरुण भांगे यास दिनांक ०७.०२.२०२४ रोजी ताब्यात घेवुन नागपुर मध्यवर्ती कारागृह नागपुर येथे स्थानबध्द ठेवण्यात आले, स्थानबध्दाचे अवैधरीत्या गावटी मोहा दारु विक्रीमुळे पोलीस स्टेशन हिंगणघाट परिसरातील जनसामान्यांचे सार्वजनीक आरोग्यावर विपरीत परिणाम होवुन मानवी जिवीतास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. तसेच पुढे होवु घातलेल्या सार्वत्रीक लोकसभा निवडणुक २०२४ लक्षात घेता, लोकसभा निवडणुका निर्भीड वातावरणात तसेच विना प्रलोभणाने पार पाडण्याचे उद्देशाने भवीष्यात सुध्दा अशा अवैध दारु विक्री, शरीराविरुध्दचे गुन्हे करणान्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ईसमांविरुध्द कठोर प्रभावी कार्यवाही करण्याचे संकेत मा. जिल्हादंडाधिकारी, वर्धा व मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी दिलेले आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर रत्तनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, तत्कालीन ठाणे प्रभारी अधिकारी मारुती मुळुक, पोलीस निरीक्षक मनोज गभणे, पो.स्टे. हिंगणघाट, सहा, पोलीस उप निरीक्षक संजय खल्लारकर, गिरीश कोरडे, पोहवा/अमोल आत्राम, स्था.गु.शा. वर्धा, नापोशी/आशीष मेश्राम, पो.स्टे. हिंगणघाट यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये