आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्तामहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

चंद्रपुरात गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा

भाजयुमो व भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने आयोजन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर महानगरातील विविध शाळा व महाविद्यालयातील शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये १० वी व १२ वीच्या परीक्षेत गुणवत्तेसह उतिर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कार्यक्रम दि. ९ जुलै २०२३ रोजी सकाळी १० वाजता शहरातील पठाणपूरा मार्गावरील जैन भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.
पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात होत असलेल्या या विद्यार्थी संन्मान कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणुन चंद्रपूरातील ज्येष्ठ विधीज्ञ रविंद्र
भागवत मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, राज्याचे वने, व सांकृतीक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोगळे, भाजप नेते डॉ. अशोक जिवतोडे, डॉ. किर्तीवर्धन दिक्षीत, डॉ. एम. जे. खान प्रमुख अतिथी म्हणुन लाभणार आहेत.
कार्यक्रमास भाजपाचे चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय राऊत, खुशाल बोंडे, प्रमोद कडु, राजेद्र गाधी, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशीष देवतळे, भाजयुमो  महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निबाळकर व अन्य मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.

रविवार दि. ९ जुलै २०२३ रोजी राष्ट्रीय विद्यार्थी दिवसाच्या निमित्त आयोजित या गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्याला विद्यार्थी, पालकवर्ग व विविध शाळांच्या मुख्याध्यापक, प्राचार्य, भाजप पदादिकारी, कार्यकर्ते  तसेच नागरिकांनी बहुसंखेने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चा व भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर महानगरच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये