ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षक भरतीचा तीढा अखेर सुटला.

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मागणीला यश.

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र राज्यातील अनेक षाळांत शिक्षकांची अनेक पदे रिक्त होती. त्या रिक्त पदांवर शिक्षक भरती करीता 21678 पद भरतीची जाहीरात पवित्र पोर्टल वर प्रसिद्ध झाली असून आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मागणी ला यश प्राप्त झाले असून शिक्षक पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यातील अनेक शाळांत इंग्रजी, गणित, विज्ञान यासह अनेक विषयाचे पदे रिक्त होती. यामुळे विज्ञार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. शिक्षक भरती तात्काळ व्हावी म्हणून आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विधानसभेत अनेक वेळा आवाज उठविला. त्यासोबतच मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मा. षिक्षण मंत्री दिपकजी केसरकर यांची भेट घेऊन शिक्षक भरती तात्काळ घेण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणी ला यश प्राप्त झाले असून राज्यातील 34 जिल्हा परिषद शाळेत 12522, 18 मनपातील शाळेत 2951, 80 नगर परिषद/नगर पालिकेतील शाळेत 477 तसेच राज्यातील 1123 खासगी अनुदानीत शैक्षणिक संस्थांमधील शाळेत 5728 रिक्त पदांची जाहीरात पवित्र पोर्टल वर प्रसिद्ध झाली असून शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी 2022 मधील उर्तीण उमेदवारांना प्राधान्य क्रम दाखल करण्यासाठी संदेश प्राप्त झाले आहे. या प्राधान्य क्रमाच्या आधारे लवकरच शिक्षक भरती प्रक्रिया पुर्ण होणार आहे.

सदर भरती प्रक्रियेत सध्या 70 टक्के रिक्त जागांवर भरती होणार असून उर्वरीत 30 टक्के रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात याकरीता पाठ पुरावा करणार असल्याचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले आहे. सदर शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाल्याने अनेक शिक्षक पात्रता परिक्षा उमेदवारांनी आमदार प्रतिभाताई यांचे आभार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये