ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेटगांव माल येथे सांस्कृतिक कार्यक्रम

गावातील गुणवंतांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

 जि.प. प्राथ.शाळा पेटगांव (माल ) येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शामंत गायकवाड उपसरपंच ग्रा.पं. जांब बु. तर उद्घाटक म्हणून वर्षा गेडाम सरपंच जांब बुज हे होते.

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष शामंत गायकवाड यांनी शाळा ही समाज घडविण्याचे काम करणारी एकमेव संस्था आहे, शाळा आणि समाजात एकोपा असला की गावाची नक्कीच प्रगती होते आणि हा एकोपा,पालकांच्या शाळेविषयी असणाऱ्या आपुलकीतून आज दिसतो आहे त्यामुळे पुढील काही दिवसात पेटगांव येथील शाळा नक्कीच आदर्श शाळा म्हणून इतरांसाठी आदर्श ठरेल असे मनोगत आपल्या अध्यक्षीय भाषणातून शामंत गायकवाड यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमात गावातील सेवा शिक्षक म्हणून मोहनशा सोयाम,सहा कार्य अधिकारी भक्तदास आभारे,महाराष्ट्र पोलीस संतोष दहेलकर,सुरज सोयाम ,मुकेश सोयाम,मुखरू गेडाम व शरद मडकाम यांचा सत्कार करण्यात आला.

 सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध नकलाच्या माध्यमातून अंधश्रद्धा, शिक्षण व व्यसनमुक्ती या विषयावर उपस्थित जनसमुदायाचे मनोरंजनासोबतच प्रबोधन केले. सोबतच आदिवासी नृत्य,कोळी नृत्य, देशभक्तीपर व लावणी अशा विविध प्रकारचे आकर्षक नृत्यप्रकार सादर करून उपस्थित जनसमुदायाचे मनोरंजन केले.

विध्यार्थ्यांनी आपल्या मध्ये असलेल्या सुप्त गुणांची झलक दाखवली. व अनेक विध्यार्थी नि उत्तम नृत्य सादर करून आणि खास प्रथमच गावातील महिलांनी सहभाग घेऊन उपस्थितीतांची दाद मिळविली याप्रसंगी सत्कारमूर्ती सेवानिवृत्त शिक्षक सोयाम सर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले आदर्श पिढी घडवीण्याचे कार्य शिक्षकांच्या हातून होत असते शिक्षकांनी उत्तम विध्यार्थी घडविण्याचे कार्य करावे आजचा विध्यार्थी हा उद्याचा उत्तम नागरिक आहे असेही सोयाम सर यांनी आपल्या भाषणातून सांगितले.

तसेच या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती भक्तदास आभारे यांनी परीस्थिती समोर न खचता परीस्थिती सामना करावा व मिळालेल्या संधीचे सोने करावे असे यांनी आपल्या अनुभवातून सांगितले.

या व्यासपीठावर उपस्थित ग्रामपंचायत सदस्य कांताबाई शामकुळे, रमेश गेडाम, भास्कर धानफोले, मुकरु गेडाम, शरद मडकाम, रामचंद्र दहेलकर, यदुनंदन पाल, , साईनाथ पेंदोर, मोहनशाह सोयाम से. नि. शिक्षक, प्रेमिला पेंदोर, दर्शना आभारे , आनंदराव पेंदोर, सौरव गोहणे शाळा व्यस्थापन समितचे अध्यक्ष देवानंद आभारे, उपाध्यक्ष शकुंतला ठाकुर, मानिक डाकोटे,निरुता सोयाम, अाशा वर्कर वंदना मडकाम शीतल आभारे अ. सेविका,भारत सोयाम, माजी पो. पा. कवडुजी डाकोटे व अन्य मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन आर. एम. गुरनुले सर सहा,शिक्षक यांनी केले. तर आभार मुख्याध्यापक गेडाम सर यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, शालेय बालमंत्रीमंडल,माता पालक गट,सर्व पालक यांनी योग्य सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये