चोरट्यांनी घरासमोरुन दुचाकी पळविली
चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत गेडाम
नागभीड- सावरगाव माता वार्ड तळोधी (बा.) येथील मोनील वसंतराव देशमुख (३७) यांनी आपल्या घरासमोर बजाज बाक्सर वाहन क्र. एम.एच.३४ एच. ०७४० ठेवली असतांना 3 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी लंपास केली. सकाळी आपल्या घरासमोर असलेली गाडी चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी तळोधी (बा.) पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली. तळोधी (बा.) पोलीस स्टेशन चे ठाणेदार अजितसिंग देवरे व पि.एस.आय. भाष्कर पिसे यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. मागील आठ दिवसांपूर्वी तळोधी बा.पासून काही अंतरावर असलेल्या कोजबी माल येथील राईस मिल मध्ये सुध्दा चोरट्यांनी रोख रक्कम व काही माल लंपास केला होता.
त्यामुळे त्वरित चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तळोधी (बा.) च्या वतीने करण्यात येत आहे.